शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

नागपूरनजिकच्या मौदा येथे चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने २२ मुलांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 12:33 IST

नागपूरजवळच्या मौदा तालुक्यातील तोंडली या गावात शाळा सुटल्यानंतर खेळत असताना मुलांनी चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने २२ मुलांना विषबाधा झाली.

आॅनलाईन लोकमतनागपूर : नागपूरजवळच्या मौदा तालुक्यातील तोंडली या गावात शाळा सुटल्यानंतर खेळत असताना मुलांनी चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने २२ मुलांना विषबाधा झाली. या सर्व मुलांनी ओकाऱ्या करायला सुरुवात केल्याने त्यांना कोदामेंढी आणि खात येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. खात येथे प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. कोदामेंढी आरोग्य केंद्रात डॉक्टर नसल्याने मुलांच्या नातेवाईकांची गैरसोय झाली होती. सर्वांची प्रकृती स्थिर व धोक्याबाहेर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. ही घटना येथे मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली.विषबाधा झालेल्या मुलांमध्ये सानिया कारूजी बाबरे (१०), साहील जगनाडे (९), नक्ष प्रमोद जवजारे, ऋषी राजेश शेंडे (५), संस्कार जगदीश शेंडे (५), समर जीवन उके (६), सिद्धार्थ जीवन उके (५), आउस दिलीप धांडे (९), दीपासू ज्ञानेश्वर ठवकर (६), समिक्षा ज्ञानेश्वर ठवकर (१०), समीर राजू आखले, नयन महेश जवजारे, मधुकर लोहकरे, राजू आखले, सुजन श्रावण ईश्वरकर (८) सर्व रा. तोंडली, ता. मौदा यांच्यासह अन्य सात मुलांचा समावेश आहे. त्यांची नावे कळू शकली नाही.हे सर्व मुले गावालगतच्या मोकळ्या जागेवर नेहमीप्रमाणे सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास खेळत होती. शेजारी चंद्रज्योतीची झाडे असल्याने तसेच त्या झाडांना फळे असल्याने काहींनी चंद्रज्योतीच्या बिया खायला सुरुवात केली. त्या बिया चवीला चांगल्या लागत असल्याने इतर मुलांनीही त्या खाल्ल्या.खेळणे आटोपल्यानंतर सर्व मुले आपापल्या घरी निघून गेली. त्यानंतर सायंकाळी ६.४० वाजताच्या सुमारास या मुलांना एका पाठोपाठ एक अशा ओकाऱ्या व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे गावात खळबळ उडाली. परिणामी, पालकांनी १७ मुलांना कोदामेंढी आणि पाच मुलांना खात येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले.खात येथे चार मुलांवर प्रथमोपचार करून त्यांना लगेच भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना करण्यात आले. या आरोग्य केंद्रात सध्या सुजल ईश्वरकर याच्यावर उपचार सुरू आहे.दुसरीकडे १७ मुलांना कोदामेंढी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले. मात्र, त्या आरोग्य केंद्रात एकाही डॉक्टर हजर नसल्याने कुाावरही प्रथमोपचार करण्यात आले नाही.त्यामुळे या सर्व मुलांना लगेच भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. या सर्व मुलरंची प्रकृती स्थिर व धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

कोदामेंढीतील डॉक्टर बेपत्ताकोदामेंढी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन डॉक्टरांची नियुक्ती आहे. मंगळवारी रात्री या दोनपैकी एकही डॉक्टर कर्तव्यावर नव्हता. त्यामुळे येथे उपचारासाठी आणलेल्या १७ मुलांच्या पालकांची मोठी गैरसोय झाली. या प्रकाराची माहिती मिळताच अशोक हटवार यांच्यासह कोदामेंढी येथील नागरिकांनी आरोग्य केंद्रात धाव घेतली. त्यांनी सर्व मुलांना भंडारा येथे पोहोचविण्यासाठी पालकांना मदत केली. या आरोग्य केंद्रातील दोन्ही डॉक्टर नेहमीच बेपत्ता राहात असून, दोघेही कधीच मुख्यालयी राहात नाही, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. या प्रकारामुळे पालकांसह नागरिकांनीही संताप व्यक्त केला. दुसरीकडे कोदामेंढीचे सरपंच भगवान बावनकुळे यांनी आरोग्य केंद्रातील भेट पुस्तिकेत तक्रार नोंदवली आहे. शिवाय, या प्रकाराची माहिती फोनवर अरोली पोलिसांना दिली.

आरोग्य केंद्राला ठोकले कुलूपया प्रकारामुळे कोदामेंढी येथील नागरिक चांगलेच संतप्त झाले होते. या आरोग्य केंद्रात डॉक्टर राहात नसल्याने स्थानिक व परिसरातील गरीब रुग्णांची मोठी परवड होते. उपचाराचराअभावी कोदामेंढी येथील एका नागरिकाचा १५ आॅक्टोबर रोजी मृत्यू झाला. अनेक गरीब रुग्णांना डॉक्टर नसल्याने उपचारासाठी खासगी डॉक्टरकडे जावे लागत असून, त्यासाठी पदरमोड करावी लागते. त्यामुळे संतप्त नागरिकांनी रात्री १० वाजताच्या सुमारास या आरोग्य केंद्राला चक्क कुलूप ठोकले 

टॅग्स :Healthआरोग्य