नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. शहर व ग्रामीणमध्ये मागील सात दिवसांपासून रुग्णांची संख्या २५च्या आत आहे. दरम्यानच्या काळात जिल्हाबाहेरील रुग्ण दिसून येत नसताना मंगळवारी दोन रुग्ण व दोन मृत्यूची भर पडली. रुग्णांची एकूण संख्या १६१२ तर मृतांची संख्या १४३० झाली आहे. नागपूर जिल्ह्यात आज २२ रुग्ण आढळून आले असून मृत्यूची नोंद झाली नाही.
शहरात सोमवारी ५०७७, ग्रामीणमध्ये १६६१ असे एकूण ६७३८ तपासण्या झाल्या. पॉझिटिव्हिटीचा दर ०.३२ टक्क्यांवर गेला. नागपूर जिल्ह्यात ४ जुुलैपासून ते आतापर्यंत रोज २० ते २५ दरम्यान रुग्ण आढळून येत आहेत तर, एक ते दोनच्या दरम्यान मृत्यूची नोंद होत आहे. शहरात आज १८ तर ग्रामीणमध्ये २ रुग्ण आढळून आले. शहरात रुग्णांची एकूण संख्या ३,३२,७२५ मृतांची संख्या ५२९९ झाली आहे. ग्रामीणमध्ये १,४३,०३७ रुग्ण आढळून आले असून २३०७ रुग्णांचा जीव गेला आहे. नागपूर जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या ४,७७,३७४ तर मृतांची संख्या ९०३६वर पोहचली आहे.
- ४,६८,२३१ रुग्णांची कोरोनावर मात
कोरोनातून आज ३२ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत शहरातील ३,२७,७२३ तर ग्रामीणमधील १,४०,५०८ असे एकूण ४,६८,२३१ रुग्णांची कोरोनावर मात केली. हा दर ९८ टक्क्यांवर पोहचला आहे. सध्या कोरोनाचे १०७ सक्रिय रुग्ण आहेत. यातील ११६ रुग्ण विविध शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. १९ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहे.
:: कोरोनाची मंगळवारची स्थिती
दैनिक चाचण्या: ६७३८
शहर : १८ रुग्ण व ० मृत्यू
ग्रामीण : २ रुग्ण व ० मृत्यू
ए. बाधित रुग्ण :४,७७,३७४
ए. सक्रिय रुग्ण : १०७
ए. बरे झालेले रुग्ण : ४,६८,२३१
ए. मृत्यू : ९०३६