शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीत कोरोनाचे पुन्हा २२ रुग्ण; आरोग्यविभाग चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2023 19:59 IST

Nagpur News कोरोनाचा वाढत्या प्रादूर्भावाने चिंता वाढली आहे. दोन दिवसांपूर्वी २२ रुग्ण आढळून आले असताना शनिवारी तेवढ्याच रुग्णांची भर पडली.

नागपूर : कोरोनाचा वाढत्या प्रादूर्भावाने चिंता वाढली आहे. दोन दिवसांपूर्वी २२ रुग्ण आढळून आले असताना शनिवारी तेवढ्याच रुग्णांची भर पडली. यातील २० रुग्ण शहरातील असून २ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. रुग्णांची एकूण संख्या ५ लाख ८७ हजार ५७३ झाली आहे तर, मृतांची संख्या १० हजार ३५८वर स्थिर आहे.   

 नागपूर शहर व ग्रामीण मिळून मागील चौविस तासांत १६५ चाचण्या झाल्या. त्यातील १३ टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आले. आज कोरोनाचे९ रुग्ण रुग्णालयातून घरी परतले. सध्यास्थितीत शहरात ६१, ग्रामीण भागात १९ तर जिल्हाबाहेरील ३ असे ८३ रुग्ण अ‍ॅक्टीव्ह आहेत. यातील मेडिकलमध्ये १३, रेल्वे हॉस्पिटलमध्ये ७, प्रादेशिक मनोरुग्णालयात २, एम्समध्ये १ तर खासगी रुग्णालयात ५ असे एकूण २८ रुग्ण रुग्णालयात आहेत. तर ५५ रुग्ण गृहविलगीकरणात आहेत.

- पाच दिवसांत ७२ रुग्णमागील पाच दिवसांत नागपूर जिल्ह्यात कोरोनाचे ७२रुग्ण आढळून आले. यात २८ मार्च रोजी १७, २९ मार्च रोजी ८, ३० मार्च रोजी २२, ३१ मार्च रोजी ३ तर १ एप्रिल रोजी २२ रुग्णांची नोंद झाली. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्य विभागाने पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करून जास्तीत जास्त कोव्हिड चाचणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस