शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
2
लष्करी जवानाकडे हेरॉईन सापडले; श्रीनगरहून पंजाबला करत होता तस्करी, अटकेमुळे खळबळ
3
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं
4
Maharashtra Politics :'फडणवीसांनी डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत मानावं', संजय राऊतांची भाजपावर टीका
5
Mumbai: मेट्रो-३ च्या प्रवासात मोबाइलला 'नो नेटवर्क', प्रवाशांची उडते तारांबळ, तिकीट काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना...
6
वेळ काय, तुम्ही बोलता काय...; कर्नल सोफिया यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या विजय शाहंना कोर्टाने फटकारलं
7
४० हजारांचं पॅकेज, ५ तासांची सर्जरी... हेअर ट्रान्सप्लांट करणाऱ्या अनुष्काबद्दल धक्कादायक खुलासे
8
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
9
हेअर ट्रांसप्लांटमुळे दोघांचा मृत्यू; ही सर्जरी खरंच सुरक्षित आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती...
10
दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, भारताचंही नाव घेतलं! इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ  
11
रोहित शर्मा 'भलतेच काहीतरी' वाटावे असे बोलून गेला, मग लगेच असं दिलं स्पष्टीकरण (VIDEO)
12
ट्रम्प यांचं टॅरिफ लागून अवघा काही वेळही झाला नाही आणि भरला सरकारचा खजिना, कुठून आला पैसा?
13
जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
14
कोंकणा सेन शर्मा घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात? ७ वर्ष लहान अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चा
15
पाकिस्तानला लोनवर लोन... चीनसोबत अमेरिकेची वाढती मैत्री तर नाही ना कारण? भारताचं टेन्शन काय?
16
Datta Upasana: जगातील एकमेव दत्तहस्त पूजास्थान; जिथे दत्त महाराजांच्या हाताचे छाप उमटले!
17
"ती भारताबाहेर गेली अन्...", दिग्दर्शकाने सांगितलं 'रेड २'मध्ये इलियानाला न घेतल्याचं कारण
18
नेहा पेंडसेच्या लेकींना पाहिलंत का?, फॅमिलीसोबत बालीत करतेय व्हॅकेशन एन्जॉय
19
रुपाली गांगुलीला सेटवर कुत्रा चावला? 'अनुपमा' फेम अभिनेत्रीचा राग अनावर, म्हणाली- "हात जोडून सांगते.."
20
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला

होळीच्या रंगांमुळे नागपुरात २१ जणांच्या डोळ्यांना दुखापत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 11:42 IST

अतिउत्साहाचा सण असलेल्या होळी आणि धुळवड हे दोन्ही दिवस काहींसाठी नीरस ठरले. रंगाने संसर्ग झालेले, हाणामारीत व किरकोळ अपघातात जखमी झालेल्या एकूण १०१ जणांवर जणांवर मेडिकल व मेयो रुग्णालयात उपचार करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अतिउत्साहाचा सण असलेल्या होळी आणि धुळवड हे दोन्ही दिवस काहींसाठी नीरस ठरले. रंगाने संसर्ग झालेले, हाणामारीत व किरकोळ अपघातात जखमी झालेल्या एकूण १०१ जणांवर जणांवर मेडिकल व मेयो रुग्णालयात उपचार करण्यात आले. खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या याहून जास्त असल्याचे बोलले जाते. विशेष म्हणजे, डोळ्यांत रंग जाण्यापासून ते जखम होणाऱ्या २१ जणांवर मेडिकलच्या नेत्ररोग विभागात उपचार करण्यात आले.इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) अपघात विभागात गुरुवारी दिवसभरात होळीमुळे अपघात झालेले, भांडणे होऊन जखमी झालेले व मद्यप्राशन केलेले असे ३३ जणांवर उपचार करण्यात आले. यातील कोणी गंभीर नसल्याची माहिती वैद्यकीय उपअधिक्षक डॉ. सागर पांडे यांनी दिली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) बुधवार रात्रीपासून होळीशी संबंधित रुग्णांवर उपचार करण्यात आले. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश गोसावी यांनी सांगितले, रंगपंचमीच्या दिवशी अपघात विभागात १२० रुग्ण दाखल झाले यातील ५५ रुग्ण होळीशी संबंधित तर मेडिसीन अपघात विभागात दाखल झालेल्या १५९ रुग्णांमधून १३ रुग्ण हे होळीशी संबंधित होते. हे रुग्ण मारामारीत, अपघातात किरकोळ जखमी झालेले व पोलिसांच्या ‘ब्रेथ अल्कोहोल अ‍ॅनालायझर’या मशीनमध्ये सापडलेले होते.

नेत्ररोगाचे दोन रुग्ण गंभीरमेडिकलच्या नेत्ररोग विभागाचे डॉ. अशोक मदान यांनी सांगितले, होळीच्या दिवशी २१ जणांच्या डोळ्यांना दुखापत झाली. यात प्रौढांमध्ये १९ तर लहान मुलांमध्ये दोन रुग्णांचा समावेश आहे. प्रौढांमधील दोन रुग्णांच्या डोळ्यात रसायनयुक्त रंग गेल्याने बुबुळाला जखम झाली. त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले. यातील एकाने स्वत:च्या जबाबदारीवर रुग्णालयातून सुटी घेतली तर दुसºया एका रुग्णावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इतर १९ रुग्णांवर तातडीने उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत या वर्षी रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Holiहोळी