शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात २१ नवे रुग्ण; रुग्णसंख्या ६५२

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 11:03 IST

आतापर्यंत ग्रीन झोन असलेल्या वर्धा जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याने खळबळ उडाली आहे. यात एका रुग्णांचा व एकाचा मृत्यूनंतरचा अहवाल पॉझिटिव्ह आला. विशेष म्हणजे, अमरावती जिल्ह्यातही एका रुग्णाचा मृत्यूनंतरचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तर अकोल्यात उपचार घेत असलेल्या रुग्णाचा मृत्यू झाला.

ठळक मुद्दे वर्धेत कोरोनाचा शिरकाव तीन मृत्यूची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आतापर्यंत ग्रीन झोन असलेल्या वर्धा जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याने खळबळ उडाली आहे. यात एका रुग्णांचा व एकाचा मृत्यूनंतरचा अहवाल पॉझिटिव्ह आला. विशेष म्हणजे, अमरावती जिल्ह्यातही एका रुग्णाचा मृत्यूनंतरचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तर अकोल्यात उपचार घेत असलेल्या रुग्णाचा मृत्यू झाला. विदर्भात तीन मृतांसह संख्या ३१ वर पोहोचली आहे. या शिवाय, विदर्भात २१ नवे रुग्ण आढळून आल्याने रुग्णांची संख्या ६५२ झाली आहे. नागपुरात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होऊ लागला आहे. रविवारी पुन्हा ११ नमुने पॉझिटिव्ह आले. येथील रुग्णांची संख्या २९४ वर पोहोचली आहे. अकोला जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत असताना मृताची संख्याही वाढत आहे. येथे सात नव्या रुग्णांची नोंद तर उपचार घेत असलेल्या ५० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. येथील रुग्ण संख्या १५४ तर मृताची संख्या १२ वर गेली आहे. यातील एका रुग्णाने आत्महत्या केली आहे. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथून नागपूर मेडिकलमध्ये उपचारासाठी आणलेल्या रुग्णाचा वाटेतच मृत्यू झाला. या रुग्णाचा नमुना पॉझिटिव्ह आल्याने अमरावती जिल्ह्यात आणखी एका मृताची नोंद झाली आहे. येथील रुग्णसंख्या ७९ तर मृताची संख्या १३ झाली आहे. वर्धा जिल्ह्यात पहिल्यांदाच कोरोनाबाधितांची नोंद झाली. यात उपचार घेत असलेला एका रुग्णांचे नमुने पॉझिटिव्ह आले तर उपचारासाठी नेत असलेल्या ३५ वर्षीय महिलेचा वाटेतच मृत्यू झाला. या महिलेचा नमुना पॉझिटिव्ह आला. बुलडाणा जिल्ह्यात गेल्या दोन आठवड्यात एकाही नव्या रुग्णाची नोंद नाही. यातच नोंद झालेले २४ रुग्ण कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून घरी गेले. पुढील २२ दिवसांत या रुग्णांमध्ये लक्षणे न आढळल्यास व नव्या रुग्णाची नोंद न झाल्यास हा जिल्हा कोरोनामुक्त होऊ शकतो. यवतमाळ जिल्ह्यात एकाही रुग्णाची नोंद नाही. येथील रुग्णसंख्या ९७ असून यातील १५ रुग्ण कोरोनामुक्त झाले.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस