शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
4
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
5
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
6
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
7
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
8
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
9
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
10
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
11
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
12
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
13
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
14
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
15
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
16
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
17
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
18
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
19
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
20
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

२०० रुग्णांवर जमिनीवर उपचार!

By admin | Updated: November 25, 2015 07:09 IST

गर्दीने ओसंडून वाहणारे वॉर्ड, ओपीडीच्या बाहेर भलीमोठी रांग, भरलेल्या खाटा अन् जमिनीवर गाद्या टाकून झोपलेले रुग्ण... हे

सुमेध वाघमारे ल्ल नागपूरगर्दीने ओसंडून वाहणारे वॉर्ड, ओपीडीच्या बाहेर भलीमोठी रांग, भरलेल्या खाटा अन् जमिनीवर गाद्या टाकून झोपलेले रुग्ण... हे उपराजधानीतील शासकीय रु ग्णालयातील चित्र रुग्णांचे हाल स्पष्ट करणारे आहे. मेडिकल व मेयो या दोन्ही रुग्णालयांच्या खाटांची क्षमता १ हजार ९९५ आहे, मात्र रुग्णांची संख्या २ हजार २०० पर्यंत जाते, ज्यातील सुमारे २००वर रुग्णांना खाटा मिळत नाही. परिणामी, गर्भवती महिलेला दुखणे सहन करीत तर बाळंतिणीला आपल्या नवजात शिशूला कवटाळून जमिनीवर उपचार घ्यावे लागतात.विशेष म्हणजे, शहरात सर्व मिळून ६५६ रुग्णालयांमध्ये १० हजार ६४५ खाटांची संख्या आहे. १० हजार लोकसंख्येच्या मागे १०० खाटा असणे गरजेचे आहे. परंतु लोकसंख्येच्या तुलनेत प्रति २३५ नागरिकांमध्ये एक खाट असे प्रमाण येत असल्याचे विदारक चित्र आहे. शहर वाढत आहे; त्यातुलनेत रुग्णालयांची संख्या अपुरी पडत आहे. शहरात दुर्दैवाने एखादे नैसर्गिक संकट आले आणि त्यामध्ये २० हजार नागरिक पीडित झाले तर काय होईल, याची कल्पनाच न केलेली बरी. धन्वंतरीचे पाईक रुग्णसेवेसाठी तत्पर असतील, पण सेवा देणार कुठे हाच प्रश्न भविष्यात समोर येणार आहे. २०११ साली २० लाख लोकसंख्या असलेले नागपूर शहर ३० लाख लोकसंख्येच्या पुढे सरकले आहे. शहरात मनपाचे ३७ दवाखाने, १२ हेल्थ पोस्ट व १० माता-बाल संगोपन केंदे्र आहेत. यातील महापालिकेच्या पाचपावली दवाखान्यात १०, गांधीनगर येथील इंदिरा गांधी रुग्णालयात ८० तर इमामवाडा येथील आयसोलेशन दवाखान्यात ४० खाटा अशा एकूण १३० रुग्णांसाठी खाटांची व्यवस्था आहे. ३५ महिला रुग्णांना खाटाच उपलब्ध नाही४इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) ३० वर्षांपूर्वी मंजूर असलेल्या खाटांची संख्या आजही कायम आहे. या रुग्णालयात ५९४ मंजूर खाटा आहेत. वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेता या खाटा अपुऱ्या पडतात. या रुग्णालयाच्या स्त्रीरोग विभागात खाटांची संख्या ७० आहे. मात्र १२५वर रुग्ण राहात असल्याने साधारण ५० रुग्णांना खाटेअभावी जमिनीवर उपचार घेण्याची वेळ येते.मेडिकलमध्ये शंभरावर गर्भवती, बाळंतिणींवर जमिनीवर उपचार४शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) मंजूर खाटांची संख्या १ हजार ४०१ आहे. मागील २५ वर्षात एकही खाट वाढविण्यात आली नाही. या काळात रुग्णांची संख्या दुप्पटीने वाढली तरी शासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. मेडिकलमध्ये खाटा कमी असल्याचा सर्वात जास्त फटका स्त्रीरोग, अस्थिरोग व बालरोग विभागाला बसतो. प्रसूती विभागात सद्यस्थितीत शंभरावर गर्भवती व बाळंतिणी जमिनीवर उपचार घेत आहेत. अस्थिरोग व बालरोग विभागातही अशीच स्थिती आहे.