कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत-चीन सीमेवर बंदोबस्तासाठी असणारे २०० तिबेटियन सीमा सुरक्षा दलाचे जवान बेळगावहून बुधवारी सकाळी अकरा वाजता कोल्हापुरात उतरले तेथून ते कोल्हापूर-गोंदिया एक्स्प्रेस रेल्वेने नागपूरकडे रवाना झाले. सशस्त्र बंदोबस्तात उतरलेली जवानांची फौज पाहून कोल्हापूरकर भारावून गेले. निवडणुकीसाठी बाहेरून बंदोबस्त मागविल्याची चर्चा शहरात पसरली. अधिकारी अरुण चौधरी यांच्याकडे जवानांबद्दल चौकशी केली असता त्यांनी हा बंदोबस्त कोल्हापूर-गोंदिया रेल्वेने नागपूरला रवाना होत असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)
निवडणूक बंदोबस्तास २०० तिबेटियन जवान नागपूरला रवाना
By admin | Updated: October 2, 2014 23:31 IST