शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

२०० वैद्यकीय अधिकारी अडचणीत

By admin | Updated: August 29, 2015 03:21 IST

राज्यातील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात प्रशासकीय कार्यांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावणारे वैद्यकीय अधिकारी मागील अनेक वर्षांपासून अस्थायी म्हणूनच काम करीत आहे.

दर चार महिन्यांनी नियुक्तीपत्राचे नुतनीकरण नागपूर : राज्यातील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात प्रशासकीय कार्यांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावणारे वैद्यकीय अधिकारी मागील अनेक वर्षांपासून अस्थायी म्हणूनच काम करीत आहे. प्रशासनातर्फे दर चार महिन्यांमध्ये नियुक्ती पत्राचे नुतनीकरण केले जाते. यामुळे या अधिकाऱ्यांचे भविष्य अधांतरी असल्याचे कारण सांगितले जात आहे. पूर्वी सार्वजनिक आरोग्य विभागाद्वारे वैद्यकीय अधिकाऱ्यांना शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात येत होते. परंतु, आरोग्य विभागाने आपल्या सर्व अधिकाऱ्यांना परत बोलावले. यामुळे तात्पुरती सोय म्हणून कंत्राटपद्धतीवर वैद्यकीय अधिकारी नेमण्यात येऊ लागले. सध्या राज्यभरातील १४ वैद्यकीय कॉलेजमध्ये जवळपास २०० वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. त्यात काही पाच ते तीन वर्षांपासून सेवा देत आहेत. या पदासाठी कमितकमी ‘एमबीबीएस’ योग्यता असते. नियुक्तीदरम्यान यांना नियमित आॅर्डर दिली जात नाही. उलट चार महिन्यानंतर नियुक्तीचे आॅर्डरचे नुतनीकरण केले जाते. सर्व प्रशासकीय कार्यांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारे मेडिकल अधिकाऱ्यांची ‘ड्युटी’ २४ तासांची असते. परंतु, शासनाने या अधिकाऱ्यांना स्थायी करण्याचा कोणताही विचार केला नाही. मेडिकल आणि मेयो कॉलेजमध्ये जवळपास ५० वैद्यकीय अधिकारी (एमओ) नियमित न झाल्याने त्यांच्यावर नेहमीच टांगती तलवार असते. कर्तव्यात जराही चूक झाल्यास किंवा अधिष्ठात्यांचे समर्थन न मिळाल्यास नियुक्ती पत्राचे नुतनीकरण होणार की नाही याची शाश्वती नसल्याचे एका अधिकाऱ्याने नाव न लिहिण्याच्या अटीवर सांगितले.(प्रतिनिधी)मेडिकल अधीक्षकही प्रभारी!मेडिकल अधिकाऱ्यांसोबतच वैद्यकीय अधीक्षकसुद्धा प्रभारी आहेत. कोणत्याही विभागप्रमुखाकडे ही जबाबदारी सोपविली जाते. रुग्णालय व प्रशासकीयसह रुग्णांची काळजी व तक्रारींचा निपटारा अधीक्षकांना करावा लागतो. सकाळी विभागाची ‘ओपीडी’ सांभाळणे व दुपारी प्रशासकीय कामकाज पाहणे अशी दुहेरी भूमिका त्यांना पार पाडावी लागते. शासन एका अधिकाऱ्याकडून प्रशासकीय व वैद्यकीय अशी दोन काम करवून घेते. वेतन मात्र एकाच पदाचे देते, हे विशेष.