शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

नेदरलँडच्या किस्टोनमॅब कंपनीचा मिहानमध्ये २०० कोटींचा प्रकल्प

By जितेंद्र ढवळे | Updated: January 28, 2024 19:41 IST

एमएडीसीसोबत सामंजस्य करार : सेझमध्ये उभारणार फार्मा युनिट

नागपूर: महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड (एमएडीसी) आणि नेदरलँडची कंपनी किस्टोनमॅब यांच्यामध्ये रविवारी खासदार औद्योगिक महोत्सव – ॲडव्हांटेज विदर्भमध्ये २०० कोटी रुपयांचा प्रकल्प स्थापन करण्याकरिता सामंजस्य करार करण्यात आला.

असोसिएशन फॉर इंडस्ट्रिअल डेव्हलपमेंट (एड) च्या वतीने खासदार औद्योगिक महोत्सव-ॲडव्हांटेज विदर्भचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीच्या परिसरात आयोजन करण्यात आले आहे. रविवारी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी फार्मास्युटिकल क्षेत्राच्या चर्चासत्रादरम्यान एमएडीसी व नेदरलँडच्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. मिहान सेझमध्ये नेदरलँडची किस्टोनमॅब ही कंपनी नावीन्यपूर्ण डोज-फॉर्म सोल्युशन्सचा निर्मिती प्रकल्प स्थापन करणार आहे. याद्वारे ३०० लोकांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या रोजगार मिळणार आहे. याशिवाय ३०० कोटींचा वार्षिक महसूलदेखील प्राप्त होणार आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत किस्टोनमॅबचे सीईओ डॉ. तुषार सातव, सीसीओ डॉ. रोलँड मिजेल व एमएडीसी लिमिटेडचे निवृत्त अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रकाश पाटील यांनी करारावर स्वाक्षरी केली. यावेळी एडचे अध्यक्ष आशिष काळे व सचिव डॉ. विजय शर्मा उपस्थित होते.फार्माच्या या सत्रात एएमटीझेडचे सीईओ डॉ. जितेंद्र शर्मा, नितिका फार्माचे रवलीन खुराना, झीम लॅबचे डॉ. अनवर दौड, अतुल मंडलेकर, ॲट्रमचे अमित कुमार शर्मा, आलोक सिंग, आदी मान्यवरांनी सहभाग नोंदवला.

टॅग्स :nagpurनागपूर