शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

विदर्भात ट्रान्सपोर्टचा दररोज बुडत आहे २०० कोटींचा व्यवसाय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 23:13 IST

Transport business is sinking लॉकडाऊनमध्ये केंद्र आणि राज्य सरकारने ट्रान्सपोर्टला वाहतुकीची परवानगी दिली आहे. पण देशाच्या बहुतांश राज्यात आणि महाराष्ट्रात दुकाने बंद असल्याने आणि उद्योगांमध्ये उत्पादन ठप्प असल्याने संपूर्ण देशात ८० टक्के मालवाहतूक बंद आहे. त्याचा फटका विदर्भातील ट्रान्सपोर्टला बसला असून विदर्भात दररोज २०० कोटींचा व्यवसाय बुडत असल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊन व डिझेल दरवाढ मुख्य कारण : अनेकांचे बँकांचे हप्ते थकले, पॅकेज जाहीर करावे

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : लॉकडाऊनमध्ये केंद्र आणि राज्य सरकारने ट्रान्सपोर्टला वाहतुकीची परवानगी दिली आहे. पण देशाच्या बहुतांश राज्यात आणि महाराष्ट्रात दुकाने बंद असल्याने आणि उद्योगांमध्ये उत्पादन ठप्प असल्याने संपूर्ण देशात ८० टक्के मालवाहतूक बंद आहे. त्याचा फटका विदर्भातील ट्रान्सपोर्टला बसला असून विदर्भात दररोज २०० कोटींचा व्यवसाय बुडत असल्याची माहिती आहे.

मालवाहतूक बंद असल्याने मालाचा तुटवडा जाणवत आहे. लॉकडाऊनमध्ये ८० टक्के ट्रक जागेवरच उभी आहेत. कारखान्यांमध्ये आवश्यक मालाचे उत्पादन होत आहे, पण विक्री होत नसल्याने मालाची ने-जा बंद आहे. केवळ जीवनावश्यक वस्तू, लोखंड, सिमेंट आणि कोळशाची वाहतूक सुरू आहे. याशिवाय मालाची चढउतार करणाऱ्या कामगारांचा तुटवडा आहे. त्यामुळे संकट आणखी वाढले आहे.

दुसरीकडे डिझेलच्या किमतीत दररोज वाढ होत आहे. वर्षभरात डिझेलच्या किमतीत प्रति लीटर २० ते २२ रुपयांची वाढ होऊन किंमत ८८.६४ रुपयांवर पोहोचली आहे. ट्रक जागेवर थांबण्याचे हे कारणही समजले जात आहे. कोरोना काळात अनेक ड्रायव्हर आणि क्लिनरच स्वगृही परतले असून त्यांची कमतरता जाणवत आहे. भीतीमुळे ते परत येण्यास तयार नाहीत. या कारणानेही ट्रक रस्त्यावर धावत नाहीत. डिझेलच्या किमती वाढल्यानंतरही भाडे वाढविण्यास कुणीही तयार नाहीत. एक ट्रान्सपोर्टर म्हणाले, लॉकडाऊनपूर्वी हैदराबादचे भाडे ५ हजार आणि मुंबईचे भाडे १० हजार रुपये मिळायचे. पण आता तेवढेही भाडे मिळत नाहीत. ग्राहक भाडे कमी करून माल नेण्यास सांगत आहेत. तोटा सहन करून माल वाहतूक करणे शक्य नाही. त्यापेक्षा ट्रक जागेवरच उभे करणे परवडेल. हायवेवर ट्रक फार कमी संख्येत धावत आहेत. हायवेवरील पंपावर डिझेल भरण्यास कुणीही जात नाहीत. एक महिन्यापासून स्थिती खराब आहे. दिवसेंदिवस आणखी गंभीर होत आहे. देशात सर्वच राज्यात लॉकडाऊनची स्थिती निर्माण झाली आहे.

नागपूर ट्रक्स युनिटीचे अध्यक्ष कुक्कू मारवाह म्हणाले, केवळ नागपुरात १८ ते २० हजार तर संपूर्ण विदर्भात ३० हजार ट्रक आहेत. यापैकी ८० टक्के ट्रक जागेवरच उभे आहेत. त्यामुळे दररोज जवळपास २०० कोटींचा व्यवसाय बुडत आहे. एक ट्रक ४० ते ५० लाखांचा होतो. लॉकडाऊनमुळे अनेकांचे बँकांचे मासिक हप्ते सहा महिन्यांपासून देणे बंद आहे. त्यावर चक्रवाढ व्याज लागत आहे. ट्रक व्यवसायात पूर्वीच रोड टॅक्स दिला जातो. याशिवाय विमा आधीच काढला जातो. अशा स्थितीत केंद्र सरकारने माल वाहतूकदारांना ट्रकचा रोड टॅक्स आणि इन्शुरन्समध्ये सूट द्यावी. शिवाय बँकांकडून सवलत मिळावी. तसेच केंद्र सरकारने या क्षेत्राला दिलासा देण्यासाठी २ हजार कोटींचे पॅकेज जाहीर करावे. लॉकडाऊननंतरही हा व्यवसाय सुरळीत होण्यासाठी सहा महिने लागतील. शिवाय सर्व ट्रक रस्त्यावर धावण्यास दोन वर्ष लागणार असल्याचे मारवाह म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbusinessव्यवसाय