शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

आरटीईच्या प्रवेशासाठी मागितले २० हजार रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 10:10 IST

आरटीईच्या प्रवेशात आता दलालही सक्रिय झाले आहे. समाधान केंद्राकडे आलेल्या तक्रारीत एका दलालाने पालकाकडून २० हजार रुपये घेतले आहे. विशेष म्हणजे या दलालाने आरटीईचे बोगस प्रवेशपत्र पालकांला उपलब्ध करून दिले.

ठळक मुद्देदलाल सक्रियसमाधान केंद्रात तक्रारी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आरटीईच्या प्रवेशात आता दलालही सक्रिय झाले आहे. समाधान केंद्राकडे आलेल्या तक्रारीत एका दलालाने पालकाकडून २० हजार रुपये घेतले आहे. विशेष म्हणजे या दलालाने आरटीईचे बोगस प्रवेशपत्र पालकांला उपलब्ध करून दिले.राईट टू एज्युकेशन अंतर्गत नामांकित शाळेत आर्थिक दुर्बल घटकाच्या मुलांना मोफत शिक्षणाची संधी शासनाने उपलब्ध करून दिली. पण या योजनेतून पैसे लाटण्याचा प्रकार काही दलाल करीत आहे. या तक्रारी एका पालकाला शिंदे नावाच्या दलालाने नामांकित शाळेत प्रवेश करून देतो म्हणून २० हजार रुपये मागितले. पैसे दिल्यानंतर पालकाला नामांकित शाळेचे बोगस प्रवेशपत्रही दिले. पालक जेव्हा शाळेत पोहचले, तेव्हा शाळेने प्रवेश देण्यास नकार दिला. त्यामुळे पालकाची फसगत झाल्याचे निदर्शनास आले. यासंदर्भात पालकाने समाधान केंद्राकडे तक्रार केली.

सधन पालकाने नाकारला प्रवेशअनुसूचित जमातीच्या पालकाला आरटीई प्रवेशासाठी उत्पन्नाची मर्यादा नाही. त्यामुळे एका सधन पालकाने आरटीईत अर्ज केला. त्या पालकाच्या मुलाचा लॉटरीमध्ये नामांकित शाळेत नंबरही लागला. पण पालक जेव्हा व्हेरीफिकेशन सेंटरवर गेल्यानंतर गरीब पालकांची प्रवेशासाठी होत असलेली तगमग लक्षात घेता, त्या पालकाने स्वत: मुलाचा आरटीईत प्रवेश नाकारला.

३७६५ मुलांचे झाले प्रवेशआरटीईच्या पहिल्या लॉटरीत जिल्ह्यात ५७०१ बालकांची निवड झाली. पहिल्या फेरीच्या प्रवेश प्रक्रियेला शिक्षण विभागाने मुदतवाढ दिली. गुरुवारपर्यंत जिल्ह्यात ३७६५ बालकांचे प्रवेश निश्चित झाले होते. यातील २१४ बालकांचे प्रवेश रद्द झाले असून, १७१५ पालकांनी अजूनही संपर्क साधलेला नाही.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र