शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

‘आपली बस’च्या डेपोत घुसून २० बसच्या काचा फोडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 23:45 IST

धंतोली परिसरातील यशवंत स्टेडियमलगतच्या पटवर्धन ग्राऊं ड येथील आपली बसच्या डेपोत रविवारी रात्री १० च्या सुमारास सशस्त्र अज्ञात १०-१२ गुंड प्रवृत्तीच्या युवकांनी घुसून २० बसच्या काचा फोडल्या तसेच सुरक्षा रक्षकाला काठीने जबर मारहाण केली. जो दिसेल त्याला मारहाण करून दहशत निर्माण केली. यामुळे घाबरलेला सुरक्षा रक्षक व कार्यरत सुपरवायझर जीवाच्या भीतीने पळून गेले.

ठळक मुद्देपोलिसात तक्रार : सशस्त्र आरोपींची सुरक्षा रक्षकाला मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धंतोली परिसरातील यशवंत स्टेडियमलगतच्या पटवर्धन ग्राऊं ड येथील आपली बसच्या डेपोत रविवारी रात्री १० च्या सुमारास सशस्त्र अज्ञात १०-१२ गुंड प्रवृत्तीच्या युवकांनी घुसून २० बसच्या काचा फोडल्या तसेच सुरक्षा रक्षकाला काठीने जबर मारहाण केली. जो दिसेल त्याला मारहाण करून दहशत निर्माण केली. यामुळे घाबरलेला सुरक्षा रक्षक व कार्यरत सुपरवायझर जीवाच्या भीतीने पळून गेले.यासंदर्भात धंतोली पोलिसात तक्रार करण्यात आली. परंतु या घटनेतील आरोपींना अटक झाली की नाही, याची माहिती पुढे आली नाही. यासंदर्भात महापालिका प्रशासनालाही माहिती देण्यात आली. यासंदर्भात महापालिका प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.सूत्रांच्या माहितीनुसार रात्री ९ वाजताच्या सुमारास एक चालक ड्युटी संपल्याने बस डेपोत जमा करण्यासाठी धंतोली येथील भाजपा कार्यालयाकडून डावीकडे वळत असताना रस्त्यावरील विजेचा वायर बसच्या छताला अडक ल्याने तुटला. तो एका कारवर व इतर वाहनांवर पडला. यामुळे बस चालकासोबत काही लोकांचा वाद झाला. काही युवक मारायला धावल्याने चालक बस सोडून डेपोत पळून गेला. त्यानंतर १०-१२ युवक हातात काठ्या घेऊ न आले. दगडफेक करीत डेपोत घुसले. त्यांनी डेपोतील बसच्या काचांची तोडफोड केली. यासंदर्भात मे.आर.के.सिटी बस ऑपरेटर नीलमणी गुप्ता यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या घटनेला दुजोरा दिला.दरम्यान आरोपींनी पळून जाताता डेपोजवळ उभ्या असलेल्या एमएच/३१/सीएन/३५०३ क्रमांकाच्या कारच्या समोरच्या व मागच्या काचा फोडल्या.आरोपींनी काचा फोडलेल्या बसेसबस क्रमांक एमएच/३१/सीए/६१५१, एमएच/३१/एफसी/९९०, एमएच/३१/सीए/६२४१, एमएच/३१/सी/६१५४, एमएच/३१/एफसी/ ९३९, एमएच/३१/एफसी/३८९,एमएच/३१/एफसी/९७०,एमएच/३१/एफसी/९४१,एमएच/३१/एफसी/९७१,एमएच/३१/एफसी/९४५, एमएच/३१/एफसी/९४२, एमएच/३१/एफसी/५०९, एमएच/३१/एफसी/९४६ आदी बसेसच्या समोरील काचा फोडण्यात आल्या. तर एमएच/३१/एफसी/९४०, एमएच/३१/एफसी/९४७, एमएच/३१/एफसी/३७७, एमएच/३१/सीए/६१६३, एमएच/३१/सीए/६१३७, एमएच/३१/सीए/६१४०, एमएच/३१/सीए/६१६० या गाड्यांच्या मागील बाजूच्या काचा फोडल्या.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाBus Driverबसचालक