शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

जात पडताळणी सदस्यांवर दोन लाखाचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 23:04 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व रोहित देव यांनी शुक्रवारी एका प्रकरणात गडचिरोली जिल्हा जात प्रमाणपत्र वैधता पडताळणी समितीचे सदस्य सचिव जितेंद्र चौधरी व उपाध्यक्ष सुरेश वानखेडे यांच्यावर प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंड ठोठावून ही रक्कम प्रसिद्ध समाजसेवक डॉ. अभय बंग यांच्या ‘सर्च’ संस्थेला देण्याचा आदेश दिला.

ठळक मुद्देहायकोर्ट : ‘सर्च’ संस्थेला रक्कम देण्याचा आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व रोहित देव यांनी शुक्रवारी एका प्रकरणात गडचिरोली जिल्हा जात प्रमाणपत्र वैधता पडताळणी समितीचे सदस्य सचिव जितेंद्र चौधरी व उपाध्यक्ष सुरेश वानखेडे यांच्यावर प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंड ठोठावून ही रक्कम प्रसिद्ध समाजसेवक डॉ. अभय बंग यांच्या ‘सर्च’ संस्थेला देण्याचा आदेश दिला.प्राथमिक शिक्षक किसन चौके यांच्या याचिकेमध्ये समितीच्या सदस्यांना दणका देण्यात आला. २०११ मध्ये चौके व त्यांच्या मुलाने माना अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी समितीकडे दावे सादर केले होते. समितीने आधी मुलाचा दावा खारीज केला. त्यामुळे मुलाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. नोव्हेंबर-२०१७ मध्ये उच्च न्यायालयाने समितीचा निर्णय रद्द करून मुलाला माना अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र जारी करण्याचा आदेश दिला. असे असताना समितीने चौके यांचा दावा स्वतंत्रपणे तपासण्याचा निर्णय घेऊन तो दावा नामंजूर केला. त्यामुळे चौके यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.अंतिम सुनावणीनंतर उच्च न्यायालयाने प्रकरणातील विविध तथ्य लक्षात घेता समितीची खरडपट्टी काढली. आम्ही मुलाला माना अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र जारी करण्याचा आदेश दिला असताना समिती त्या मुलाच्या वडिलाला समान प्रमाणपत्रासाठी अपात्र ठरविण्याचे धाडस कसे करू शकते, असे ताशेरे न्यायालयाने ओढले. तसेच, समितीला यासंदर्भातील महत्त्वपूर्ण न्यायनिवाड्यांची आठवण करून दिली. न्यायालयाची चपराक बसल्यानंतर समितीने चौके यांना माना अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र जारी केले. परंतु, त्यामुळे न्यायालयाचे समाधान झाले नाही. न्यायालयाने समितीच्या वरील दोन सदस्यांना दंड ठोठावला. चौके यांच्यावतीने अ‍ॅड. सुनील खरे यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयCaste Certificateजात वैधता प्रमाणपत्र