शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

‘ईव्हीएम’विरुद्ध २ला सर्वपक्षीय एल्गार

By admin | Updated: February 28, 2017 01:57 IST

महापालिका निवडणुकीत ईव्हीएममध्ये घोळ करून निवडणुकीचे निकाल मॅनेज करण्यात आले आहे.

मोर्चा धडकणार : महापालिका निवडणूक रद्द करण्याची मागणीनागपूर : महापालिका निवडणुकीत ईव्हीएममध्ये घोळ करून निवडणुकीचे निकाल मॅनेज करण्यात आले आहे. त्यामुळे ही निवडणूक रद्द करून बॅलेटद्वारे फेरनिवडणूक घेण्यात यावी, यासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आहे. याविरोधात लढा उभारण्यासाठी ‘लोकशाही बचोओ’ समिती स्थापन करण्यात आली आहे.भालदारपुरा येथील केजीएन सभागृहात यासंदर्भात सोमवारी सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रीय जनसुराज्य पार्टी, मुस्लीम लीग, बहुजन समाज पार्टी, हलबा आघाडी यासह अपक्ष उमेदवार उपस्थित होते. २ मार्चला सकाळी ११ वाजता चिटणीस पार्क ते संविधान चौक असा भव्य मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवडणूक रद्द करण्याची मागणी करणार आहे.यावेळी काँग्रेसचे माजी शहर अध्यक्ष शेख हुसेन, शिवसेनेचेसतीश हरडे, तौसिफ खान, किशोर पराते, सुरेश जग्यासी, मिलिंद सोनटक्के, सुशील बालपांडे, रमण ठवकर, अ‍ॅड. प्रदीप अग्रवाल यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते. यावेळी पराभूत सदस्यांनी आपली भूमिका मांडली. सबळ पुराव्यानिशी न्यायालयात जाण्यावर चर्चा करण्यात आली. प्रदीप अग्रवाल यांनी कायदेशीर बाजूंची माहिती देऊ न पुराव्यासह न्यायालयात जाण्याचा निर्णय घेण्यात आला.(प्रतिनिधी)राष्ट्रध्वजाने करणार आंदोलनाची सुरुवातआंदोलनात कोणत्याही एका पक्षाचा झेंडा राहणार नाही. राष्ट्रध्वज हाती घेऊन आंदोलन क रण्यात येणार आहे. यावेळी ईव्हीएम हटाओ, देश बचाओ, असा सर्वांचा एकच नारा राहणार आहे. कार्यकर्ते आपापल्या भागातून बॅनरसह आंदोलनात सहभागी होणार आहेत.मोजणीत मतदान वाढलेमहापालिका निवडणुकीत ईव्हीएममध्ये घोळ केल्याने अनेक प्रभागात धक्कादायक प्रकार घडले. प्रभाग क्रमांक १ मधील मतदानातील घोळाची सुरेश जग्यासी, माधुरी सोनटक्के, मीना यादव व सूरज आवळे यांनी माहिती दिली. प्रत्यक्षात ३१,११० मतदान झाले असताना मतमोजणीत मात्र ३२,४१७ झाले. १३७० मते कशी वाढली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीतील ईव्हीएम मशिनीवर तीव्र आक्षेप घेऊन या सर्व निवडणुका रद्द करून, पुन्हा बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, अशी मागणी अतुल सेनाड यांनी सोमवारी पत्रपरिषदेत केली. अमेरिकासारख्या प्रगत देशाने ईव्हीएम मशीन नाकारून बॅलेट पेपरवरील निवडणूक सुरू केली आहे. मात्र आपल्या देशात अजूनही त्याच ईव्हीएमचा वापर केला जात आहे. फेरनिवडणुकीसंदर्भात निवेदन निवडणूक आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनाही देणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी संजय बारई, महेश महाडिक व सुनील वाघमारे उपस्थित होते. ईव्हीएममध्ये घोळ महापालिका निवडणुकीतील ईव्हीएम मशीनमध्ये घोळ झाल्याचा आरोप बहुजन समाज पार्टीचे उमेदवार नितीन नागदेवते यांनी पत्रपरिषदेत केला. मतदानाच्या दिवशी ईव्हीएम मशीन चुकीच्या क्रमाने लावण्यात आल्या होत्या. नारा येथील मतदान कें द्रावर एक तास ईव्हीएम मशीन बंद पडली होती. त्यावेळी मोठ्या प्रमाणात घोळ झाला. तरी ईव्हीएम मशीनद्वारे झालेल्या या सर्व निवडणुका रद्द करून, बॅलेट पेपरवर पुन्हा निवडणुका घेण्यात याव्या, अशी त्यांनी मागणी केली. अन्यथा आपण न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कविता लांडगे व मनीष बन्सोड उपस्थित होते.