शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

२०२२ पर्यंत राज्यात उभारणार १९.४ लाख घरे; प्रकाश मेहता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 21:14 IST

राज्यातील ३८२ शहरात पंतप्रधान आवास योजना-सर्वांसाठी घरे राबविण्याला केंद्र सरकारने मंजुरी दिलेली आहे. सन २०२२ सालापर्यंत राज्यात १९ लाख ४ हजार घरे उभारण्यात येतील अशी माहिती गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी सोमवारी विधान परिषदेत लक्षवेधीच्या उत्तरात दिली.

ठळक मुद्देपंतप्रधान आवास योजनेसाठी कोणतेही अर्ज स्वीकारलेले नाही

आॅनलाईन लोकमतनागपूर : राज्यातील ३८२ शहरात पंतप्रधान आवास योजना-सर्वांसाठी घरे राबविण्याला केंद्र सरकारने मंजुरी दिलेली आहे. सन २०२२ सालापर्यंत राज्यात १९ लाख ४ हजार घरे उभारण्यात येतील अशी माहिती गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी सोमवारी विधान परिषदेत लक्षवेधीच्या उत्तरात दिली.राज्यातील महापालिका निवडणुकीपूर्वी पंतप्रधान आवास योजनेसाठी गरजू लोकांकडून अर्ज भरून घेण्यात आले होते. या अर्जांचे पुढे काय झाले असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला होता. यावर पंतप्रधान आवास योजनेसाठी राज्य शासनाकडून कोणत्याही प्रकारचे अर्ज स्वीकारण्यात आलेले नाहीत, अशी माहिती मेहता यांनी दिली.महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास अधिनियम १९७६ अन्वये प्राधिकरणाचे उद्दिष्ट वाढविण्यात आले आहे. सोलापूर व चंद्रपूर येथे विशेष नियोजन प्रकल्प हाती घेण्यात आले आहे. योजना प्रत्यक्षात राबविण्यासाठी विविध वित्तीय संस्थाकडून कर्ज उभारण्यात येत आहे. त्या व्यतिरिक्त अग्रीम अंशदान, प्राधिकरणाचा स्वत:चा निधी शासन अनुदान यातूनही गृहनिर्माण योजना प्रत्यक्षात राबविण्यात येतात. ही कामे प्रादेशिक महामंडळामार्फत राबविण्यात येतात. म्हाडाअंतर्गत कार्यरत असलेल्या प्रादेशिक मंडळामार्फत मार्च २०१७ पर्यंत एकूण ६ लाख ६४ हजार ९५४ सदनिका बांधण्यात आलेल्या आहेत. २०१७-१८ या वर्षासाठी १४ हजार ४४० सदनिकाचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती प्रकाश मेहता यांनी दिली.मुंबई शहरातील सर्व झोपडपट्ट्यांचे जीपीएस लेडार तंत्रज्ञानावर आधारित सर्वेक्षण प्राधिकरणाकडून क रण्यात आले आहे. बायोमेट्रिक सर्वेक्षण प्रगतिपथावर आहे. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या माध्यमातून शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाने या संबंधात स्टेट बँक आॅफ इंडियाशी समझोता करार के ला आहे. नगर विकास विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार नागरी जमीन अधिनियमानुसार औद्योगिक विभागातील घटकांना मोकळ्या जमिनी औद्योगिक वापरासाठी संपादनातून सूट देण्यात आली आहे. नऊ नागरी समूहांमध्ये एकूण २८१६.५३ हेक्टर जमीन क्षेत्रास औद्योगिक प्रयोजनासाठी सूट देण्यात आल्याची माहिती मेहता यांनी दिली.गुन्हे दाखल असलेल्यांना काळ्या यादीत टाकणारविकास नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या ज्या विकासकांवर गुन्हे दाखल आहेत, अशा विकासकांना काळ्या यादीत टाकण्यात येईल, अशी माहिती मेहता यांनी प्रश्नाच्या उत्तरात दिली.

 

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७Prakash Mehtaप्रकाश मेहता