शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

महिलांच्या कोचमधील १९ प्रवाशांना तुरुंगवास

By admin | Updated: February 19, 2015 01:54 IST

गोंडवाना एक्स्प्रेसमध्ये महिलांसाठी राखीव कोचमधून प्रवास करणाऱ्या १९ प्रवाशांच्या चांगलेच अंगलट आले.

नागपूर : गोंडवाना एक्स्प्रेसमध्ये महिलांसाठी राखीव कोचमधून प्रवास करणाऱ्या १९ प्रवाशांच्या चांगलेच अंगलट आले. रेल्वे सुरक्षा दलाने त्यांना पकडून रेल्वे न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना प्रत्येकी तीन हजार रुपये दंड सुनावला. दंड भरण्यासाठी पैसे नसल्यामुळे सर्वांना २५ फेब्रुवारीपर्यत तुरुंगात रवाना करण्यात आले.रेल्वे अ‍ॅक्ट १६२ नुसार महिलांसाठी राखीव कोचमधून पुरुष प्रवाशांनी प्रवास करणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे. परंतु अनेकजण त्याकडे दुर्लक्ष करून महिलांसाठी राखीव कोचमधून प्रवास करतात. बुधवारी सकाळी रेल्वेगाडी क्रमांक १२७२१ हैदराबाद-निजामुद्दीन गोंडवाना एक्स्प्रेसच्या महिलांसाठी राखीव कोचमध्ये १९ पुरुष प्रवासी प्रवास करीत होते. रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी त्यांना पकडून रेल्वे न्यायालयात हजर केले. प्रवाशांमध्ये पप्पू शहा (२६) रा. फटीयाबाजार गोपालगंज, सरवन नव्वदे दास (२४) समस्तीपूर उत्तरप्रदेश, अजय गुप्ता (२२) बिहार वजगर कृषीनगर उत्तरप्रदेश, अरविंद रामबहादुर पासवान (२०) समध पांडे टोला, गोरखपूर, नरेश घासीटाप्रसाद पटेल (४६) नारा मंडला, भजनलाल मरार बालाघाट, आसाराम मानेधर (४५) बालाघाट, रणजित शर्मा (२२) कृषीनगर उत्तरप्रदेश, दिलीप दुर्गाप्रसाद (१८) रिवा मध्यप्रदेश, अशोक ढेहरीया (२१) कांची खाभाटीया, शिवनी, मिंटु वर्मा (२२) कुशीनगर, चेतन मानकर (१९) वर्धा, रोशन रावत (२०) वर्धा आदींचा समावेश आहे. रेल्वे प्रवाशांना रेल्वे न्यायालयाने प्रत्येकी तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. परंतु संबंधित प्रवाशांजवळ दंड भरण्यासाठी पैसे नसल्यामुळे त्यांना २५ फेब्रुवारीपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. (प्रतिनिधी)