शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील हसनबागेत २९ लाख रुपयाची वीजचोरी उघडकीस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 00:27 IST

वीज वितरण फ्रेंचाईजी एसएनडीएलने मंगळवारी हसनबाग येथे पोलिसांच्या मदतीने मोठी कारवाई करीत २९ वीज कनेक्शन्समधून तब्बल २८.९० लाख रुपयाची वीजचोरी केली असल्याचे उघडकीस आणले.

ठळक मुद्देएसएनडीएलच्या कारवाईने तणाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वीज वितरण फ्रेंचाईजी एसएनडीएलने मंगळवारी हसनबाग येथे पोलिसांच्या मदतीने मोठी कारवाई करीत २९ वीज कनेक्शन्समधून तब्बल २८.९० लाख रुपयाची वीजचोरी केली असल्याचे उघडकीस आणले. विशेष म्हणजे, एसएनडीएलची ही कारवाई सुरू असताना परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. अनेक घरांमध्ये पथकाच्या कारवाईचा तीव्र विरोध करण्यात आला. एका ठिकाणी एसएनडीएलच्या महिला कर्मचाऱ्याला ढकलण्यात आल्याची बाबही पुढे आली आहे. मात्र, पोलीस कर्मचारी मदतीला असल्याने या भागात कारवाई करणे शक्य झाले.नंदनवन पोलीस ठाण्याच्या सहकार्याने मंगळवारी एसएनडीएलच्या कारवाईस सुरुवात झाली. कारवाईमध्ये एपीआय मिलिंद तायडे आणि पीएसआय वाघ यांच्या नेतृत्वात पोलीस कर्मचाऱ्यांनी भाग घेतला. कारवाईदरम्यान एसएनडीएलच्या पथकाने ८३ ठिकाणी चौकशी केली. यात २९ ठिकाणी वीजचोरी होत असल्याचे उघडकीस आले. या २९ वीज कनेक्शन्समधून तब्बल ८.९० लाख युनिट्सची चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. त्याचे २८.९० लाख रुपये इतके इस्टिमेट बनविण्यात आले. कारवाईदरम्यान अनेक घरांमध्ये जुने इलेक्ट्रो मेकॅनिकल मीटर असल्याचे दिसून आले. या मीटर्सला नव्या डिजिटल मीटरमध्ये बदलविण्यात आले. दरम्यान, वीजचोरी करणाऱ्यांकडून एसएनडीएलच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करण्याचेही प्रयत्न झाले. मात्र, पोलिसांच्या मदतीने समस्या सोडविण्यात आली. एसएनडीएलने दिलेल्या माहितीनुसार, लिंक कापून चोरी करण्याची १३ प्रकरणे पुढे आली आहेत. तसेच १० ठिकाणी न्यूट्रल कापून चोरी होत असल्याचे स्पष्ट झाले. एका घरी मीटरमध्येच गडबड करण्यात आल्याचेही दिसून आले.पाच ट्रान्सफॉर्मर्समधून ६५ टक्के वीजचोरी हसनबाग परिसरात पाच ट्रान्सफॉर्मर्सच्या माध्यमातून विजेचा पुरवठा केला जातो. या पाचही ट्रान्सफॉर्मर्समधून ५८ ते ६५ टक्के वीजचोरी होत असल्याचे डीटीसी ऑडिटमधून स्पष्ट झाले. ही बाब हेरूनच या भागात व्यापक अभियान चालविण्यात येत आहे. शहरातील ज्या भागात अशा घटना उघडकीस येत आहेत, अशा भागामध्येही अशाच प्रकारचे अभियान राबविण्यात येणार असल्याचे एसएनडीएलने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :electricityवीजtheftचोरी