शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

कोळसा वाहतुकीच्या नावावर वाहतूकदाराची १.९० कोटींची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 00:11 IST

कोळशाच्या वाहतुकीत ३६० कोटी रुपयांचा फायदा मिळवून देण्याची बतावणी करून एका वाहतूकदाराची १.९० कोटी रुपयांनी फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे.

ठळक मुद्दे वेकोलि अधिकाऱ्यासह तिघांवर गुन्हा : वाहतूकदाराने कर्ज घेऊन केली गुंतवणूक

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोळशाच्या वाहतुकीत ३६० कोटी रुपयांचा फायदा मिळवून देण्याची बतावणी करून एका वाहतूकदाराची १.९० कोटी रुपयांनी फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे. अंबाझरी पोलिसांनी वेकोलिच्या अधिकाऱ्यासह तिघांवर गुन्हा नोंदविला आहे. वेकोलि अधिकारी विवेककुमार विजय शुक्ला (४४) सीएमपीडीए कॉलनी, जरीपटका, अरुण थनकपन नायर (५१) मेघसागर अपार्टमेंट, हनुमाननगर आणि हरीश कंचन जैवार (४४) न्यू कॉलनी, अशी आरोपींची नावे आहेत.हिलटॉप निवासी यशवंत इंगळे वाहतूकदार आहेत. त्यांनी आरोपींना ओळखले आहे. आरोपींनी इंगळे यांना झारखंड येथे कोळशाच्या वाहतुकीचे काम देण्याचे आश्वासन दिले आणि २६ डिसेंबर २०१६ ला करार केला. त्यांना दोन कोटींची गुंतवणूक केल्यावर १० टक्के ‘स्लिपिंग पार्टनरशिप’ देण्याचे आश्वासन दिले. या व्यवसायात सर्वांना ३६० कोटींचा फायदा होईल, असे आरोपींनी सांगितले होते. इंगळेंना हरीश जैवार यांच्या यांगड अ‍ॅण्ड सन्स सर्व्हिस एन्टरप्राईजेसशी करार करण्यास सांगितले. त्यानुसार इंगळे यांनी करारसुद्धा केला.इंगळे यांच्याकडे कथित व्यवसायात गुंतवणुकीसाठी पैसे नव्हते. त्यांनी आरोपींनी सांगितल्यानुसार पुसद अर्बन को-ऑपरेटिव्हच्या गांधीबाग शाखेतून चार कोटींचे कर्ज घेतले. त्यापैकी एक कोटी ९० लाख रुपये हरीश जैवार या आरोपीच्या यांगड अ‍ॅण्ड सन्स सर्व्हिस एन्टरप्राईजेसच्या खात्यात जमा केले. त्यानंतर इंगळे कोळसा वाहतुकीचे काम मिळण्याची वाट पाहत होते. यासंदर्भात त्यांनी आरोपींकडे अनेकदा विचारपूस केली. पण आरोपी उत्तर देण्यास टाळाटाळ करू लागले. अखेर इंगळे यांनी घटनेची तक्रार अंबाझरी ठाण्यात नोंदविली. पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद करीत चौकशी सुरू केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी