शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विभागात आठ महिन्यात शिवशाहीचे १९ अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 12:28 IST

जानेवारी ते ऑक्टोबर २०१९ या कालावधीत एसटीच्या नागपूर विभागात शिवशाही बसेसचे तब्बल १९ अपघात झाल्याची नोंद असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेवरच प्रश्नचिन्ह लागले आहे.

ठळक मुद्देप्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्हएसटी महामंडळाने उपाययोजना करण्याची गरज

दयानंद पाईकराव ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एसटी महामंडळाच्या ताफ्यात प्रवाशांच्या सुविधेसाठी वातानुकूलित शिवशाही बसेस दाखल झाल्या. शिवशाही बसेसला प्रवाशांनी पसंतीही दर्शविली. परंतु अपघातांच्या बाबतीत मात्र शिवशाही बसेस सुरक्षित नसल्याचे दिसत आहे. जानेवारी ते ऑक्टोबर २०१९ या कालावधीत एसटीच्या नागपूर विभागात शिवशाही बसेसचे तब्बल १९ अपघात झाल्याची नोंद असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेवरच प्रश्नचिन्ह लागले आहे.एसटी महामंडळाने आधुनिकीकरणाकडे वाटचाल करीत प्रवाशांना दर्जेदार सेवा पुरविण्यासाठी शिवशाही बसेस महामंडळाच्या ताफ्यात दाखल केल्या. खासगी वाहतुकीच्या स्पर्धेला तोंड देण्याच्या उद्देशाने महामंडळाने उचललेले हे पाऊल यशस्वी ठरले आणि प्रवाशांचाही शिवशाही बसेसला प्रतिसाद मिळाला. परंतु सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शिवशाही बसेसवर प्रश्नचिन्ह लागले आहे. एसटीच्या नागपूर विभागात एकूण ५६ शिवशाही बसेस आहेत. यात एसटीच्या मालकीच्या २९ आणि खासगी वाहतूकदाराच्या २७ बसेसचा समावेश आहे. जानेवारी ते ऑक्टोबर २०१९ या आठ महिन्यांच्या कालावधीत एसटीच्या नागपूर विभागात शिवशाही बसेसचे तब्बल १९ अपघात झाल्याची नोंद करण्यात आली आहे. यात जानेवारी महिन्यात २, फेब्रुवारीत २, मार्च १, एप्रिल ३, मे १, जून २, जुलै २, ऑगस्ट २, सप्टेंबर २ आणि ऑक्टोबर महिन्यात २ अपघात घडले आहेत. शिवशाही बसेसच्या अपघातांची ही आकडेवारी पाहून प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. शिवशाहीची सेवा प्रवाशांसाठी चांगली आहे. परंतु अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एसटी महामंडळाने ठोस उपाययोजना केल्यास या बसेसकडे प्रवाशांचा ओढा वाढू शकतो, हेही तेवढेच खरे आहे.

खासगी बसेसवर अकुशल चालकशिवशाही बसेसच्या अपघातांचा आढावा घेतला असता या बसेसवर अकुशल चालक असल्याची माहिती एसटीच्या सूत्रांनी दिली. खासगी वाहतूकदाराकडून चालकाची नेमणूक करताना त्यांना ४८ दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येत नाही. चालकाला विश्रांतीची योग्य वेळ मिळते की नाही, याची शहानिशा करण्यात येत नाही. याशिवाय शिवशाही बसेसचा वेग अधिक असल्यामुळे या गाड्या नियंत्रित होत नाहीत.नेहमीच चालकांची चूक नसते‘रस्त्यावर अनेक वाहने धावतात. अपघात झाल्यानंतर नेहमीच शिवशाही बसेसच्या चालकाची चूक असते असे नाही. अनेकदा दुसरी वाहने शिवशाही बसेसवर येऊन आदळतात. खराब रस्तेही याला कारणीभूत आहेत. त्यामुळे चालकांवर दोष देणे चुकीचे आहे.’-संजय रामटेके, प्रभारी विभागीय नियंत्रक, नागपूर विभाग

टॅग्स :Shivshahiशिवशाही