शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

संविधानाच्या संरक्षणासाठी १८५ संघटनांनी काढली रॅली : ईव्हीएमही जाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 23:39 IST

संविधानाच्या संरक्षणासाठी संविधान बचाव संघर्ष समितीच्या नेतृत्वात १८५ संघटनांनी एकत्र येऊन रॅली काढली. संविधान चौकात रॅली पोहचल्यानंतर सायंकाळी प्रातिनिधिक स्वरूपात ईव्हीएम जाळण्यात आली.

ठळक मुद्देसरकारचा केला विरोध

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संविधानाच्या संरक्षणासाठी संविधान बचाव संघर्ष समितीच्या नेतृत्वात १८५ संघटनांनी एकत्र येऊन रॅली काढली. संविधान चौकात रॅली पोहचल्यानंतर सायंकाळी प्रातिनिधिक स्वरूपात ईव्हीएम जाळण्यात आली.विद्यापीठांमध्ये २०० पॉईंट रोस्टर सिस्टमच्या जागेवर १३ पॉईंट रोस्टर सिस्टम लागू केल्याच्या विरोधात देशातील दलित व आदिवासी संघटनांनी भारत बंदचे आवाहन केले होते. नागपुरात संविधान बचाओ संघर्ष समितीच्या नेतृत्वात भीम चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये ३०० दुचाकी होत्या. विविध रंगांचे झेंडे घेऊन विविध संघटनांचे कार्यकर्ता रॅलीत सहभागी झाले होते. रॅलीमध्ये ईव्हीएम हटाव देश बचाव, १३ पॉईंट रोस्टर बंद करा, १० टक्के सवर्ण आरक्षण रद्द करा, आदिवासींना विस्थापित करू नका, ओबीसींची जातनिहाय जनगणना करा, आदी मागण्यांसाठी नारे-निदर्शने करण्यात आली. संविधान चौकात रॅली पोहचल्यानंतर प्रा. बी.एस. हस्ते, अ‍ॅड. संदेश भालेकर, विक्की बेलखोडे, धर्मेश सहारे, व डॉ. सुनील पेंदोर यांनी मार्गदर्शन केले. प्रधानमंत्र्यांची खोटी आश्वासने, खोटे दावे यामुळे जनतेला रस्त्यावर उतरावे लागत आहे. ईव्हीएमच्या बाबतीत निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला आहे.

टॅग्स :agitationआंदोलनnagpurनागपूर