शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

विकास मंडळाचे पुनर्गठन पुरेसे नाही, अनुशेषाचे पुन्हा मोजमाप हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2022 11:45 IST

विदर्भात अजूनही १.८० लाख हेक्टर सिंचन अनुशेष; नव्याने अभ्यासाची आवश्यकता

कमल शर्मा

नागपूर : नागपूर कराराच्या ६९ व्या वर्धापनदिनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारनेविदर्भ, मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्र या तीनही विकास मंडळांचे मंगळवारी पुनर्गठन केले खरे. पण, केवळ पुनरूज्जीवनाने विदर्भ, मराठवाड्याचे भले होणार नाही. मागास भागांच्या विकासाचे पुन्हा मोजमाप करावे. विशेषत: उद्योग व सेवा क्षेत्राचा समावेश करून नव्याने अभ्यास करण्याची गरज असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.

विकासाच्या प्रादेशिक समतोलसाठी राज्यघटनेच्या कलम ३७१ (२) अंतर्गत राष्ट्रपतीच्या आदेशावर या तीनही मंडळांची स्थापना १ मे १९९४ रोजी झाली होती. त्यासोबतच अनुशेष व निर्देशांक समिती स्थापन करून नऊ क्षेत्रांमधील विकासाचे व अनुशेषाचे मोजमाप करण्याचा निर्णय झाला होता. त्यात सिंचनाचा अनुशेष मोठा होता आणि सरकारच्या ताज्या अहवालानुसार, अमरावती विभागातील अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम या चार जिल्ह्यांत अजूनही १ लाख ७९ हजार ४७७ हेक्टरचा भौतिक सिंचन अनुशेष बाकी आहे. दुसरीकडे या काळात नव्याने अनुशेष निर्माण झाला असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. भौतिक अनुशेषही वाढल्याचा दावा आहे. त्यामुळे नव्याने अनुशेषाची मोजणी व्हावी, अशी मागणी आहे.

राज्यातील तिन्ही विकास मंडळांचे पुनर्गठन, राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

असे आहे विदर्भवाद्यांचे म्हणणे...

  • अनुशेष व निर्देशांक समतीने उद्योग व व सेवा क्षेत्रातील अनुशेषाचा अभ्यास केला नव्हता. याचा तुलनात्मक अभ्यास होणे आवश्यक आहे.
  • २००१-२१ च्या रस्ते विकास योजनेत नागपूर विभागातील ८२ टक्के लक्ष्य गाठण्यात आले आहे. अमरावती विभागात फक्त ६८ टक्के काम झाले आहे.
  • ५ सप्टेंबर २०११ रोजी उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळासाठी उपसमित्या स्थापन करण्यात आल्या. त्याच धर्तीवर विदर्भसाठी नागपर व अमरावतीकरिताउपसमित्या स्थापन कराव्यात.
  • संतुलित व समतोल विकासासाठी राज्याच्या अर्थसंकल्पातील निधीचे समान वितरण व्हावे.
  • गरिबी, रोजगार, पर्यावरण यांसारख्या विदर्भातील मूळ समस्यांवर सखोल अभ्यास व्हावा.
  • मंडळांनी तयार केलेल्या अहवालावर कार्यवृत्त अहवाल जारी व्हावा.

 

*विदर्भवादी आनंदी, पण काही मागण्याही*

विकास मंडळांचे पुनर्गठन झाल्याचे विदर्भवाद्यांनी स्वागत केले आहे. विदर्भ विकास मंडळाचे माजी सदस्य डॉ. डॉ. संजय खडक्कार यांनी निर्णयाचे स्वागत करीत मंडळाच्या अध्यक्षपदी अराजकीय व्यक्तिची नेमणूक व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. तर मंडळाच्या पुनर्गठनासाठी न्यायालयात धाव घेणारे नितीन रोंघे यांनी राज्य सरकारने विदर्भाच्या आर्थिक स्थितीवर श्वेतपत्रिका जारी करण्याची मागणी केली. खडक्कार व रोंघे यांनी अनुशेषाची नव्याने मोजणी करण्यासोबतच विकास मंडळांना सशक्त करण्याचीही मागणी केली.

टॅग्स :GovernmentसरकारVidarbhaविदर्भ