शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

मार्चपूर्वी मनपाला १७५ कोटीचा विशेष निधी : वीरेंद्र कुकरेजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 23:15 IST

जानेवारी अखेरीस मालमत्ता करापासून १६० कोटी जमा झाले. शासकीय कार्यालयाकडील १०० कोटींची मालमत्ताकराची थकबाकी मार्च पूर्वी वसूल होईल. शासनाकडे विशेष निधीसाठी ३२५ कोटींची मागणी केली होती. यातील १५० कोटी प्राप्त झाले. उर्वरित १७५ कोटी मार्चपूर्वी प्राप्त होतील, असा विश्वास स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी बुधवारी व्यक्त केला.

ठळक मुद्देअर्थसंकल्पानुसार २९४६ कोटींचा महसूल प्राप्त होईलशासकीय कार्यालयाकडील १०० कोटींची थकबाकी वसुली होईल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जानेवारी अखेरीस मालमत्ता करापासून १६० कोटी जमा झाले. शासकीय कार्यालयाकडील १०० कोटींची मालमत्ताकराची थकबाकी मार्च पूर्वी वसूल होईल. शासनाकडे विशेष निधीसाठी ३२५ कोटींची मागणी केली होती. यातील १५० कोटी प्राप्त झाले. उर्वरित १७५ कोटी मार्चपूर्वी प्राप्त होतील, असा विश्वास स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी बुधवारी व्यक्त केला.स्थायी समितीने २०१८-१९ या वर्षाचा अर्थसंकल्प २९४६ कोटींचा दिला होता. मार्च अखेरीस जवळपास तितका महसूल जमा होईल. गेल्या आर्थिक वर्षात मालमत्ता करापासूत १९० कोटी जमा झाले होते. यावर्षी जानेवारी अखेरीस १६० कोटी जमा झाले. मालमत्ता कराची वसुली होत असल्याने हा आकडा वाढणार आहे. शासकीय कार्यालयाकडील १०० कोटींची थकबाकी प्राप्त होईल. न्यायालयात प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढून वसुलीचा प्रयत्न सुरू आहे. ८३ मोठे थकबाकीदार आहेत. त्यांच्याकडील थकबाकी वसुलीसाठी विशेष प्रयत्न सुरू आहे.नगररचना विभागाकडून अपेक्षित उत्पन्न जमा होताना दिसत नाही. विभागाला २५२ कोटींचे उद्दिष्ट दिले होते. जानेवारी अखेरीस या विभागाची वसुली ३१ कोटी झाली आहे. बांधकाम क्षेत्रात अपेक्षित वाढ नसल्याचा हा परिणाम आहे. मात्र मालमत्ता कर, पाणीपट्टी, बाजार विभागासह अन्य विभागाची वसुली चांगली असल्याची माहिती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिली.आयुक्तांनी अर्थसकल्पाला ३० टक्के कात्री लावण्याचा निर्णय सहमतीनेच घेतला आहे. आर्थिक शिस्तीसाठी हा निर्णय घेतला आहे. परंतु याचा विकास कामावर परिणाम होणार नाही. महापालिकेच्या तिजोरीत जमा होणारा महसूल विचारात घेता आयुक्त काही दिवसात अर्थसंकल्प सादर करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.उपराजधानीचा दर्जा असल्याने नागपूर शहराला वर्षाला २५ कोटींचे विशेष अनुदान जाहीर करण्यात आले होते. मात्र २००० सालापासून हा निधी प्राप्त झाला नव्हता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निधी मिळवून दिला. यामुळे महापालिकेला मोठा आर्थिक आधार मिळाल्याची माहिती कुकरेजा यांनी दिली.२७० कोटींनी जीएसटी अनुदान वाढलेअथंसंकल्पात जीएसटी अनुदानातून ६३० कोटी अपेक्षित धरण्यात आले होते. मात्र राज्य शासनाने अनुदानात वाढ केल्याने मार्च अखेरपर्र्यत जीएसटी अनुदानाचे ९०० कोटी जमा होतील. विशेष म्हणजे वाढीव अनुदानामुळे पुढील वर्षापासून जीएसटी अनुदानाचे वर्षाला १२०० कोटी मिळतील. डिसेंबर अखेरपर्यंत ६०८.१९ कोटी व शासकीय अनुदान २७४ .६५ कोटी महापालिकेला प्राप्त झाले. जानेवारी महिन्याचे ८६.२६ कोटी प्राप्त झाल्याची माहिती कुकरेजा यांनी दिली.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाfundsनिधी