शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

-तर १.७५ कोटी लहान दुकाने बंद होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 01:20 IST

कोरोना महामारीमुळे देशातील लहान व्यावसायिक आर्थिक संकटात आहेत. भविष्यात या व्यावसायिकांना केंद्र व राज्य शासन आणि बँकांनी मदत न केल्यास देशातील २५ टक्के अर्थात जवळपास १.७५ कोटी व्यावसायिकांची दुकाने बंद होतील. त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होणार असल्याची अशी भीती कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) एका सर्वेक्षणात व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देकोरोना महामारीचा फटका : कॅटचे सर्वेक्षण, २० लाख कोटींच्या पॅकेजमध्ये मदत नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना महामारीमुळे देशातील लहान व्यावसायिक आर्थिक संकटात आहेत. भविष्यात या व्यावसायिकांना केंद्र व राज्य शासन आणि बँकांनी मदत न केल्यास देशातील २५ टक्के अर्थात जवळपास १.७५ कोटी व्यावसायिकांची दुकाने बंद होतील. त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होणार असल्याची अशी भीती कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) एका सर्वेक्षणात व्यक्त केली आहे.देशाची अर्थव्यवस्था मंदीत आहे. या व्यावसायिकांसाठी केंद्र आणि राज्य शासनाने कोरोना समर्थन पॅकेज जाहीर करण्याची मागणी कॅटने केली आहे. कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतीया म्हणाले, देशातील किरकोळ व्यापारी संघटित आहेत, पण या क्षेत्राची गणना असंघटित क्षेत्र म्हणून केली आहे. या व्यवसायात देशात जवळपास ७ कोटी व्यावसायिकांचा समावेश आहे. शिवाय या माध्यमातून ४० कोटी जणांना रोजगार प्रदान केला असून ६० लाख कोटी रुपयांचा वार्षिक व्यवसाय करतात. भारतात या माध्यमातून जवळपास ८ हजारांपेक्षा अधिक मुख्य वस्तूंचा व्यवसाय केला जातो. त्यानंतरही बँकाया क्षेत्राला औपचारिकरीत्या आर्थिक मदत करण्यास अपयशी ठरल्या आहेत. केवळ ७ टक्के लहान व्यावसायिकांना बँकांनी मदत केली आहे उर्वरित ९३ टक्के व्यावसायिकांच्या आर्थिक गरजा अनौपचारिक स्त्रोतांवर अवंलबून आहेत.कोरोनाच्या आधीही देशातील घरगुती व्यवसाय वित्तीय संकटातून जात होता. कोरोना महामारीने हे व्यावसायिक अस्तित्वासाठी संघर्ष करीत आहेत. केंद्र सरकारने घोषित केलेल्या २० लाख कोटींच्या पॅकेजमध्ये लहान व्यावसायिकांसाठी एक रुपयाचीही तरतूद नाही. शिवाय देशातील कोणत्याही राज्याने या व्यावसायिकांना वित्तीय मदत दिलेली नाही. अर्थव्यवस्थेत सर्व क्षेत्र तसेच प्रवासी श्रमिकांनाही वित्तीय पॅकेज देण्यात आले. राजकीय लोक या व्यावसायिकांना अर्थव्यवस्थेची जीवनरेषा समजतात, त्यांना काहीही मदत दिलेले नाही. त्यानंतरही या व्याावसायिकांनी कोरोना महामारीच्या काळात नेहमीच सरकारची मदत केल्याचे भरतीया यांनी स्पष्ट केले.देशातील १.७५ कोटी दुकाने बंद झाली तर त्याची जबाबदारी केंद्र आणि राज्य शासनाची ठरणार आहे. त्यामुळे देशात बेरोजगारांची संख्या वाढले आणि अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होईल. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारताच्या स्वप्नाला क्षती पोहोचेल. केंद्र आणि राज्य शासनाने बँकांचे ईएमआय, पाणी व वीजबिल, संपत्ती कर, व्याजाचे भुगतान आदींमध्ये सूट द्यावी, असे भरतीया म्हणाले.

टॅग्स :businessव्यवसायnagpurनागपूर