शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

एमईसीएलचे १७४३ कर्मचारी सेवेत नियमित

By admin | Updated: June 21, 2017 02:29 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (एमईसीएल)च्या

हायकोर्टाचा आदेश : आवश्यक लाभ मिळण्यासाठी पात्र लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (एमईसीएल)च्या १७४३ कर्मचाऱ्यांची सेवा नियमित करण्याचा आदेश नुकताच दिला आहे. यासंदर्भात एमईसीएल एम्प्लॉईज युनियनने सचिव व्ही. सेनाड यांच्यामार्फत रिट याचिका दाखल केली होती. न्यायालयाने ही याचिका मंजूर करून १७४३ कर्मचारी सेवेत कायम ठेवण्यासाठी, नियुक्तीच्या तारखेपासून आर्थिक लाभ मिळण्यासाठी आणि ३१ मार्च २०१७ पासून नियमित कर्मचारी म्हणून वेतन व अन्य लाभ मिळण्यासाठी पात्र असल्याचे आदेशात म्हटले आहे. परंतु, हे कर्मचारी सेवेतून कमी करण्यात आल्याच्या तारखेपासून ते ३० मार्च २०१७ पर्यंत प्रत्यक्ष आर्थिक लाभ मिळण्यासाठी पात्र नसतील असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांची प्रकरणे या आदेशानुसार तपासण्याची व त्यांचे वारसदार पात्र असल्यास त्यांना आवश्यक लाभ देण्याची सूचना एमईसीएलला करण्यात आली आहे. सेवानिवृत्तीचे वय झालेले कर्मचारीसुद्धा निवृत्तीविषयक लाभ मिळण्यास पात्र असल्याचे न्यायालयाने सांगितले आहे. युनियनने २१४५ कर्मचाऱ्यांची सेवा नियमित करण्याची मागणी केली होती. केंद्र शासनाने औद्योगिक विवाद कायद्यातील अधिकारांचा वापर करून ७ जानेवारी १९९३ रोजी केंद्रीय औद्योगिक न्यायाधिकरणात याचिका दाखल केली. न्यायाधिकरणचा निर्णय अमान्य करून युनियन व एमईसीएल यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. एमईसीएलची याचिका मंजूर झाली. त्यामुळे युनियनने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सर्वोच्च न्यायालयाने युनियनला अंतरिम दिलासा दिला. त्यानंतर युनियनचे प्रकरण पुनर्निर्णय घेण्यासाठी औद्योगिक न्यायाधिकरणकडे परत पाठविले. औद्योगिक न्यायाधिकरणने १४ जानेवारी २००९ रोजी युनियनचा दावा मंजूर केला. त्यानंतर परत न्यायालयात याचिका दाखल झाल्या होत्या.