शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

चलनातून बाद झालेल्या १७ लाखांच्या नोटा जप्त

By admin | Updated: February 24, 2017 03:02 IST

तहसील पोलिसांच्या पथकाने बुधवारी मध्यरात्रीनंतर गांधीबाग परिसरात एका कारमधून १७ लाखांच्या जुन्या (चलनातून बाद झालेल्या) नोटा जप्त केल्या.

दोघे ताब्यात : तहसील पोलिसांची कारवाई नागपूर : तहसील पोलिसांच्या पथकाने बुधवारी मध्यरात्रीनंतर गांधीबाग परिसरात एका कारमधून १७ लाखांच्या जुन्या (चलनातून बाद झालेल्या) नोटा जप्त केल्या. टिफीन बॅगमध्ये लपवून या नोटा नेल्या जात होत्या. कारमधील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची पोलीस गुरुवारी पहाटेपर्यंत चौकशी करीत होते.महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीच्या पूर्वसंध्येला तहसील ठाण्याचे पोलीस पथक गस्तीवर होते. गांधीबाग लाल इमली चौकापासून काही अंतरावर असलेल्या मध्यरात्री पोलिसांना एमएच ३१/ईयू ७६८६ क्रमांकाची आय-२० कार येताना दिसली. पोलिसांनी कार थांबवली. आतमध्ये आनंद राठी (वय ३६, रा. धरमपेठ) आणि अमित येसखेडे (वय ३५, रा. बजाजनगर) हे दोन व्यक्ती आढळले. पोलिसांना पाहून ते घाबरल्याने पोलिसांचा संशय वाढला. मागच्या सीटवर दोन टिफीन बॅग आढळल्या. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्यात चलनातून बाद झालेल्या १००० आणि ५०० रुपयांच्या एकूण १७ लाख रुपयांच्या नोटा आढळल्या. पोलिसांनी नोटा, राठी तसेच येसखेडे आणि कार जप्त करून बुधवारी पहाटे १ च्या सुमारास त्यांना पोलीस ठाण्यात आणले. ही रोकड कुणाची आहे, त्याचा पहाटेपर्यंत पोलीस शोध घेत होते. याबाबतची सविस्तर माहिती ते दोघे टाळाटाळ करीत होते. दरम्यान, माहिती कळताच परिमंडळ ३ चे उपायुक्त संभाजी कदम आणि सहायक आयुक्त अरुण जगताप, पोलीस निरीक्षक संतोष खांडेकर पोलीस ठाण्यात पोहोचले. गुरुवारी सकाळी वरिष्ठांशी सल्लामसलत केल्यानंतर पोलिसांनी प्राप्तिकर खात्याच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर हे प्रकरण प्राप्तिकर खात्याच्या अधिकाऱ्यांना सोपविण्यात आले. चलनातून बाद झाल्यानंतर एवढी मोठी रक्कम कुणी आणि कोणत्या उद्देशाने जवळ ठेवली होती, त्याची चौकशी केली जात आहे. (प्रतिनिधी)पोलीस ठाण्यात गर्दीचलनातून बाद झालेल्या नोटा पोलिसांनी राठी आणि येसखेडेकडून पकडल्याचे कळताच पोलीस ठाण्यात मोठी गर्दी जमली. अनेकांनी पोलिसांवर वेगवेगळ्या पद्धतीने दडपणही आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना दाद दिली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, या नोटा रिझर्व्ह बँकेत जमा करण्यासाठी एका एजंटच्या घरी नेल्या जाणार होत्या.