शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

१६ वर्षीय तरुणाचे अवयवदान : तिघांना मिळाले जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 23:26 IST

अपघातात जखमी होऊन उपचारादरम्यान १६ वर्षीय तरुणाचे ‘ब्रेनडेड’ झाल्याची माहिती डॉक्टरांकडून मिळताच त्याच्या आई- वडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला. त्या असह्य दु:खातही त्यांनी आपल्या मुलाचे अस्तित्व कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.

ठळक मुद्देबद्रातीये कुटुंबाने ठेवला आदर्श

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अपघातात जखमी होऊन उपचारादरम्यान १६ वर्षीय तरुणाचे ‘ब्रेनडेड’ झाल्याची माहिती डॉक्टरांकडून मिळताच त्याच्या आई- वडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला. त्या असह्य दु:खातही त्यांनी आपल्या मुलाचे अस्तित्व कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या संयम आणि मानवतावादी भूमिकेमुळे यकृत व दोन्ही मूत्रपिंडाचे दान करण्यात आल्याने तिघांना जीवनदान मिळाले.वेदांत बद्रातीये (१६) रा. हरम गाव, परतवाडा, अमरावती असे त्या अवयवदात्याचे नाव.वेदांत हा दहावीला होता. हरम गावापासून १० किलोमीटरवर असलेल्या परतवाडा येथे तो मोटरसायकलने शिकवणी वर्गाला यायचा. १८ नोव्हेंबर रोजी शिकवणी वर्गाला येत असताना त्याच्या मोटरसायकलला दुसऱ्या मोटरसायकलने जोरदार धडक दिली. वेदांतच्या डोक्याला जबर मार बसला. त्याला तातडीने अमरावती येथील एका इस्पितळात दाखल केले. येथे त्याच्या मेंदूवर शस्त्रक्रिया झाली. परंतु प्रकृती खालावल्याने त्याला नागपूरच्या एका खासगी इस्पितळात हलविण्यात आले. उपचारादरम्यान ब्रेनडेड म्हणजे मेंदूमृत झाल्याची माहिती डॉक्टरांनी वेदांतच्या आई-वडिलांना दिली. मुलगा सोडून गेल्याचे माहीत होताच त्यांना असह्य दु:ख झाले. तेथील डॉक्टरांनी त्यांना अवयवदान करण्याचा सल्लाही दिला. नातेवाईकांनी त्याच स्थितीत वेदांतला अमरावती, परतवाडा येथील भन्साळी रुग्णालयात दाखल केले. येथील डॉ. आशिष भन्साळी यांनीही अवयवदानाचा सल्ला दिला. मृत्यूच्या दाढेत असलेल्या तीन रुग्णांना जीवनदान मिळेल, असे समुपदेशन केले. वेदांतच्या आई आणि वडिलांना ही बाब पटली. त्यांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. लागलीच याची माहिती ‘झोनल ट्रान्सप्लान्ट को-ऑर्डिनेशन सेंटर’ (झेडटीसीसी) नागपूरला देण्यात आली. समितीच्या अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी व सचिव डॉ. संजय कोलते यांच्यासह माजी सचिव डॉ. रवी वानखेडे, किडनी समितीचे तज्ज्ञ डॉ. एस. जे. आचार्य आणि डॉ. वीरेश गुप्ता यांनी पुढील प्रक्रिया पूर्ण केली. सोमवारी सकाळी भन्साळी रुग्णालयात अवयव काढण्याची प्रक्रिया सुरू झाली. यकृत व दोन्ही मूत्रपिंडाचे दान करण्यात आले.परतवाडा ते नागपूर ग्रीन कॉरिडोरसोमवारी परतवाडा येथील भन्साळी रुग्णालयातून यकृत व दोन्ही मूत्रपिंड ग्रीन कॉरिडोरने नागपुरात आणण्यात आले. यकृत एलेक्सीस हॉस्पिटलमधील ६६ वर्षीय पुरुष रुग्णाला देण्यात आले. प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया डॉ. प्रकाश जैन व डॉ. अजिताभ श्रीवास्तव यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. एक मूत्रपिंड ऑरेंजसिटी हॉस्पिटलच्या ३९ वर्षीय पुरुष रुग्णाला देण्यात आले. प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया डॉ. अमित पसारी, डॉ. संदीप देशमुख, डॉ. रोहित गुप्ता आदींनी केली. तर दुसरे मूत्रपिंड वोक्हार्ट हॉस्पिटलमधील ४३ वर्षीय एका महिला रुग्णाला देण्यात आले. प्रत्यारोपण शस्त्रक्रिया डॉ. संजय कोलते व डॉ. सूर्यश्री पांडे यांनी केली.‘एनटीओआरसी’ सेंटर वाढविण्याची गरज‘ब्रेनडेड’ रुग्णांकडून जास्तीत जास्त अवयवदान व्हायचे असेल तर ‘नॉन ट्रान्सप्लांट ऑर्ग रिट्रीव्हल सेंटर’ (एनटीओआरसी) वाढवायला हवे. भन्साळी रुग्णालयासारख्या ‘एनटीओआरसी’ची आज अवयवाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांना गरज आहे.डॉ. संजय कोलतेसचिव, झेडटीसीसी, नागपूर

टॅग्स :Organ donationअवयव दानnagpurनागपूर