शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

ठगबाज महाजनकडून १६ लाखाचा ऐवज जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 22:03 IST

अनेक ठिकाणच्या सराफा व्यावसायिकांना गंडविणारा ठगबाज आशुतोष अशोक महाजन याच्याकडून तहसील पोलिसांनी १६ लाख ५३ हजाराचा ऐवज जप्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनेक ठिकाणच्या सराफा व्यावसायिकांना गंडविणारा ठगबाज आशुतोष अशोक महाजन याच्याकडून तहसील पोलिसांनी १६ लाख ५३ हजाराचा ऐवज जप्त केला.

ठगबाज महाजनने इतवारी, हुडकेश्वर, अजनीसह ठिकठिकाणच्या सराफा व्यावसायिकांना लाखोंचा गंडा घातला आहे.दुकान बंद करण्याच्या तयारीत असताना तो सराफा व्यावसायिकांकडे जात होता. घरी धार्मिक पूजा सुरू आहे. त्यासाठी तातडीने दागिने किंवा सोन्याचे शिक्के पाहिजे असे सांगून तो तेथून खरेदी करायचा आणि गडबडीत रोख रक्कम आणायची विसरलो, असे सांगून आरोपी सराफा व्यावसायिकाला बनावट धनादेश द्यायचा. हे धनादेश बँक खात्यात पैसे नसल्यामुळे वटत नव्हते; नंतर फसवणूक झाल्याचे व्यापाऱ्यांच्या लक्षात यायचे. महाजन याने अशाप्रकारे अनेक व्यापाऱ्यांची लाखो रुपयांनी फसवणूक करून त्यांच्याकडून वेगळ्या प्रकारचे दागिने लंपास केले होते. त्याच्याविरुद्ध २२ जुलैला तहसील पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. तहसीलचे ठाणेदार जयेश भांडारकर, निरीक्षक दिलीप सागर आणि त्यांच्या सहकाºयांनी २३ जुलैला आरोपी महाजनच्या मुसक्या बांधल्या. त्याची चौकशी करून त्याच्याकडून १६ लाख ५३ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, नाणी आणि बनावट चेक जप्त करण्यात आले.वाहनेही जप्तआरोपीने अशाप्रकारे फसवणूक करून होंडा सिटी कार आणि अ‍ॅक्टिव्हा घेतली. ही दोन्ही वाहने पोलिसांनी जप्त केली. त्याने नागपूरच नव्हे तर इतर ठिकाणच्या सराफा व्यापाऱ्यांना अशाच प्रकारे गंडविल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. त्याने एकट्या इतवारीतील १० ते १५ सराफा व्यावसायिकांना लाखोंचा गंडा घातला आहे.राहण्याचे ठिकाण वारंवार बदलवितोआरोपी महाजन वारंवार राहण्याचे ठिकाण बदलवीत होता. महाल, अजनी, नंदनवन, मनीषनगर अशी वेगवेगळी ठिकाणे तो व्यापाऱ्यांना सांगत होता. तहसील पोलिसांनी त्याला रमना मारोती परिसरात राहत असताना ताब्यात घेतले. आता त्याला अजनी पोलीस ताब्यात घेणार आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी