शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

३५०० मान्यवरांच्या साक्षीने १५१ वर्षे पूर्णत्व सोहळा

By admin | Updated: September 14, 2015 03:12 IST

महापालिकेत येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत तुळशीचे रोप देऊ न केले जाते. या प्रथेनुसार राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचेही स्वागत तुळशीचे रोप देऊ न केले जाणार आहे.

राष्ट्रपतींच्या हस्ते होणार गौरव ग्रंथाचे प्रकाशन : तुळशीचे रोप देऊ न स्वागत नागपूर : महापालिकेत येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत तुळशीचे रोप देऊ न केले जाते. या प्रथेनुसार राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचेही स्वागत तुळशीचे रोप देऊ न केले जाणार आहे. मनपाच्या १५१ व्या स्थापना वर्षानिमित्त आयोजित समारंभात ३५०० लोकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रोटोकॉलनुसार व्यासपीठावर सात मान्यवर उपस्थित राहतील. यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते मनपाच्या १५१ वर्षांच्या इतिहासावर आधारित गौरव ग्रंथाचे प्रकाशन करण्यात येईल, अशी माहिती महापौर प्रवीण दटके यांनी पत्रकार परिषदेत दिली.सायंकाळी ६.३० वाजता हा सोहळा होईल. दटके यांनी रविवारी मानकापूर क्रीडा संकुलातील तयारीचा आढावा घेतला. यावेळी उपमहापौर मुन्ना पोकुलवार, सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी यांच्यासह मनपाचे अधिकारी उपस्थित होते. सुरक्षेच्या कारणामुळे व्यासपीठापासून ४५ मीटर जागा मोकळी सोडण्यात आली आहे. राष्ट्रपतींचे स्वागत कुंडीत लावलेल्या तुळशीने केले जाणार आहे, तसेच स्मृतिचिन्ह देऊ न त्यांचा सत्कार करण्यात येईल. व्यासपीठावर राष्ट्रपती यांच्या डाव्या बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महापौर प्रवीण दटके, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर तर उजव्या बाजूला राज्यपाल सी. विद्यासागर राव, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकु ळे यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. गौरव गं्रथात प्रामुख्याने अविस्मरणीय चित्रावर भर देण्यात आला आहे. कार्यक्रमासाठी शहरातील आमदार, खासदार, अधिकारी, पदाधिकारी, न्यायाधीश, विविध संस्थांचे प्रमुख आदींना निमंत्रित करण्यात आले आहे; तसेच स्वातंत्र्य सैनिक, अर्जुन पुरस्कारप्राप्त मान्यवरांनाही निमंत्रित केले आहे. (प्रतिनिधी)