शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

‘आधार’च्या अटीमुळे १५० उमेदवारांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 21:21 IST

राज्य शासनाच्या वित्त विभागातर्फे लिपिक पदासाठी आयोजित परीक्षेपासून दीडशेहून अधिक उमेदवार वंचित राहिले. या उमेदवारांनी ‘स्मार्ट’ आधार ‘कार्ड’ आणले होते. तर अधिकारी मात्र पोस्टाद्वारे पाठविलेल्या ‘कार्ड’ची मागणी करत होते. नियमांचा हवाला देत अधिकाऱ्यांनी उमेदवारांना दिलासा देण्यास नकार दिला. परिणामी बाहेरगावाहून आलेल्या उमेदवारांना परतावे लागले.

ठळक मुद्देवित्त विभागाच्या पदभरती परीक्षेपासून मुकले : पोस्टाद्वारे पाठविलेल्या ‘कार्ड’ऐवजी आणले ‘स्मार्ट कार्ड’

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य शासनाच्या वित्त विभागातर्फे लिपिक पदासाठी आयोजित परीक्षेपासून दीडशेहून अधिक उमेदवार वंचित राहिले. या उमेदवारांनी ‘स्मार्ट’ आधार ‘कार्ड’ आणले होते. तर अधिकारी मात्र पोस्टाद्वारे पाठविलेल्या ‘कार्ड’ची मागणी करत होते. नियमांचा हवाला देत अधिकाऱ्यांनी उमेदवारांना दिलासा देण्यास नकार दिला. परिणामी बाहेरगावाहून आलेल्या उमेदवारांना परतावे लागले.‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी वित्त विभागातर्फे अकाऊंट्स लिपिकपदाची परीक्षा आयोजित करण्यात आली होती. सकाळच्या सत्रात केंद्रात ८०० उमेदवारांना बोलविण्यात आले होते. परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी सरकारकडून एका खासगी कंपनीला देण्यात आली आहे. उमेदवार दिलेल्या वेळेत जी.एच.रायसोनी स्कूल आॅफ बिझनेस मॅनेजमेन्ट येथील परीक्षा केंद्रावर पोहोचले. केंद्रात प्रवेश देण्याअगोदर उमेदवारांच्या ई-प्रवेशपत्रांची तपासणी करण्यात आली. सोबतच त्यांच्याकडे मूळ ओळखपत्रदेखील मागण्यात आले. दीडशेहून अधिक उमेदवारांकडे ‘स्मार्ट’ आधार ‘कार्ड’ होते. या उमेदवारांना पोस्टाद्वारे पाठविण्यात आलेले आधार ‘कार्ड’ दाखविण्यास सांगण्यात आले. ‘स्मार्ट’ आधार ‘कार्ड’वर प्रवेश नाकारण्यात आला. उमेदवारांनी अनेकदा विनंती केली. मात्र त्याला यश आले नाही. उमेदवारांनी जिल्हा प्रशासनाकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना कुणीच प्रतिसाद दिला नाही.प्रवेशपत्रावर स्पष्ट सूचनायासंबंधात परीक्षेचे आयोजन करणाऱ्या ‘एजन्सी’चे अधिकारी हकीमुद्दीन काजी यांच्याशी संपर्क साधण्यात आला. विद्यार्थ्यांना पाठविण्यात आलेल्या प्रवेशपत्रात स्पष्ट निर्देश आहेत. शिवाय त्यात ओळखपत्र म्हणून कोणती कागदपत्रे ग्राह्य धरण्यात येतील याची यादीदेखील देण्यात आली आहे. ‘स्मार्ट कार्ड’देखील ‘ई’आधार ‘कार्ड’ प्रमाणेच आहे. विभागातर्फे देण्यात आलेल्या निर्देशांनुसार उमेदवारांना प्रवेश नाकारण्यात आला. परीक्षा न देणाऱ्या उमेदवारांची संख्या ५० हून कमी होती, असा दावा त्यांनी केला.‘ई’ प्रवेशपत्र मान्य, मग ‘स्मार्ट कार्ड’ का नाही ?या परीक्षेसाठी ‘ई’ प्रवेशपत्र जारी करण्यात आले होते. जर परीक्षा केंद्रावर ‘ई’प्रवेशपत्र वैध मानण्यात आले, तर मग ‘ई’ आधार वा ‘स्मार्ट कार्ड’ला ग्राह्य का धरण्यात आले नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अर्ज करताना ‘ऑनलाईन’ जमा केलेले छायाचित्र ‘ई’ प्रवेशपत्रावर लावायचे होते. जर उमेदवारांच्या ओळखीसंदर्भात काही शंका आली तर ‘ऑनलाईन’ तपासणीचा पर्याय होता. मात्र असे काहीही न करता अधिकाऱ्यांनी उमेदवारांना थेट बाहेरचा रस्ता दाखविला.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डexamपरीक्षा