शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

नागपुरात १५० कलावंतांनी रेखाटली ‘महारांगोळी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 01:09 IST

१५० कलावंतांची जिद्द अन् सात तासांची ‘नॉन स्टॉप’ साधना यातून विदर्भातील दीडशे कलावंतांनी चक्क ६ हजार चौरस फुटात महारांगोळी रेखाटली. रांगोळीच्या सुलेखनातून संस्कार भारतीच्या संगीत, नाटक, नृत्य, चित्रकला, लोककला, रांगोळी आदी आठ कार्यविधा आणि सहा उत्सवांचे चित्रण रांगोळीतून दर्शविण्यात आले. सोबतच विदर्भाच्या प्राणवाहिन्या वैनगंगा, पैनगंगा व वर्धा या नद्यांचे प्रवाह आणि त्यावरील पौराणिक व आधुनिक तीर्थक्षेत्रे यांचे सुरेख रेखाटन करण्यात आले. संस्कार भारती आणि ‘उत्तिष्ठ:’ या संस्थेच्या वतीने रेखाटण्यात आलेल्या महारांगोळीचे लोकार्पण करण्यात आले.

ठळक मुद्देसंस्कार भारती, ‘उत्तिष्ठ:’चे आयोजन : ६ हजार चौरस फुटात रेखाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : १५० कलावंतांची जिद्द अन् सात तासांची ‘नॉन स्टॉप’ साधना यातून विदर्भातील दीडशे कलावंतांनी चक्क ६ हजार चौरस फुटात महारांगोळी रेखाटली. रांगोळीच्या सुलेखनातून संस्कार भारतीच्या संगीत, नाटक, नृत्य, चित्रकला, लोककला, रांगोळी आदी आठ कार्यविधा आणि सहा उत्सवांचे चित्रण रांगोळीतून दर्शविण्यात आले. सोबतच विदर्भाच्या प्राणवाहिन्या वैनगंगा, पैनगंगा व वर्धा या नद्यांचे प्रवाह आणि त्यावरील पौराणिक व आधुनिक तीर्थक्षेत्रे यांचे सुरेख रेखाटन करण्यात आले. संस्कार भारती आणि ‘उत्तिष्ठ:’ या संस्थेच्या वतीने रेखाटण्यात आलेल्या महारांगोळीचे लोकार्पण करण्यात आले.सुरेंद्रनगर येथील बास्केटबॉल मैदानावर रेखाटण्यात आलेल्या महारांगोळीचे लोकार्पण प्रसिद्ध चित्रपट अभिनेते सुनील बर्वे यांच्या हस्ते झाले. यावेळी चित्रपट दिग्दर्शक राजदत्त, संस्कार भारतीचे मार्गदर्शक योगेंद्र जी., विदर्भ प्रांत अध्यक्ष कमल भोंडे, नागपूर अध्यक्ष कांचन गडकरी, महारांगोळीच्या संयोजक रोहिणी घरोटे आणि ‘उत्तिष्ठ:’चे श्याम पांडे व्यासपीठावर उपस्थित होते. स्वत:च्या कलेची परिपूर्णता ही कलावंतांसाठी अनुभूती देणारी असते. मनातील कला प्रत्यक्षात साकारताना मिळणारा स्वानंद हेच कलावंतांचे सर्वोच्च पारितोषिक असते. महारांगोळीतून हीच चेतना आणि स्वानंद प्रगट झाला आहे, असे मत सुनील बर्वे यांनी व्यक्त केले.महारांगोळीत पुरातत्त्व शास्त्रज्ञ हरिभाऊ वाकणकर, पु. ल. देशपांडे, ग. दि. माडगुळकर, सुधीर फडके आणि साहित्याचार्य बाळशास्त्री हरदास यांना या महारांगोळीच्या माध्यमातून रेखाटण्यात आले. राजेंद्र पुंड, अरुण लोणारकर, योगेश हेडाऊ, प्रदीप गज्जलवार व प्राचार्य राधा अतकरी यांनी या ‘पोर्ट्रेट’ रांगोळ्यांची निर्मिती केली. चंद्रकांत घरोटे, रोहिणी घरोटे, राजश्री कुलकर्णी, अनघा चेपे यांचे मार्गदर्शन लाभले तर श्रीकांत बंगाले यांनी रेखांकन आणि आरेखन केले. या उपक्रमात सहभागी कलावंतांचा सत्कार करण्यात आला. दीप्ती कुशवाह यांनी संचालन केले तर अपराजिता यांनी आभार मानले. यावेळी विश्राम जामदार, बंडोपंत रोडे, अजय देशपांडे, वीरेंद्र चांडक, प्रा. अनिल जोशी, आशुतोष अडोणी हेदेखील उपस्थित होते.

टॅग्स :rangoliरांगोळीnagpurनागपूर