प्रवासी त्रस्त : दिल्ली मार्गावरील वाहतूक विस्कळीतनागपूर : दाट धुके पडल्यामुळे अनेक रेल्वेगाड्या आपल्या नियोजित वेळेपेक्षा विलंबाने धावत असून यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.दिल्ली आणि इतर मार्गावर दाट धुके पडल्यामुळे मंगळवारी अनेक रेल्वेगाड्या आपल्या नियोजित वेळेपेक्षा विलंबाने धावत होत्या. दरम्यान उशिरा येणाऱ्या रेल्वेगाड्यात १२४१० हजरत निजामुद्दीन-रायगड गोंडवाना एक्स्प्रेस १५ तास, १२७२४ नवी दिल्ली-हैदराबाद एपी एक्स्प्रेस १५ तास, १२६१५ चेन्नई-नवी दिल्ली जीटी एक्स्प्रेस ५.४५ तास, १२६१६ नवी दिल्ली-चेन्नई जीटी एक्स्प्रेस १२ तास, १२२१४ दिल्ली-यशवंतपूर दुरांतो एक्स्प्रेस ६ तास, १२६२१ चेन्नई-नवी दिल्ली तामिळनाडु एक्स्प्रेस ३ तास, १२६२२ नवी दिल्ली-चेन्नई तामिळनाडु एक्स्प्रेस ९ तास, १०४६ धनबाद-छत्रपती शाहु टर्मिनस दीक्षाभूमी एक्स्प्रेस २ तास, १२७२३ हैदराबाद-नवी दिल्ली एपी एक्स्प्रेस १० तास, १२२८६ हजरत निजामुद्दीन-सिकंदराबाद दुरांतो एक्स्प्रेस १२ तास, १२७२२ नवी दिल्ली-हैदराबाद एपी एक्स्प्रेस ७ तास, १२६७० छापरा-चेन्नई गंगाकावेरी एक्स्प्रेस ५ तास, १२६५० हजरत निजामुद्दीन-यशवंतपूर संपर्कक्रांती एक्स्प्रेस ३ तास आणि १२६४६ हजरत निजामुद्दीन-एर्नाकुलम मिलेनियम एक्स्प्रेस ३ तास उशिराने धावत आहे. उशिरा येणाऱ्या रेल्वेगाड्यांमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. त्यांना रेल्वेगाड्यांची वाट पाहत ताटकळत रेल्वेस्थानकावर बसण्याची पाळी आली आहे. यामुळे रेल्वेस्थानकावरील वेटींग रुम फुल्ल झाल्याचे पाहावयास मिळाले. आणखी काही दिवस ही स्थिती कायम राहणार असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. (प्रतिनिधी)
धुक्यामुळे रेल्वेगाड्या १५ तास ‘लेट’
By admin | Updated: December 24, 2014 00:47 IST