शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे प्रवाशांना वेठीस धरणारे १५ दलाल जेरबंद

By नरेश डोंगरे | Updated: June 30, 2024 18:10 IST

ई तिकिटांची काळाबाजारी : रेल्वे सुरक्षा दलाकडून कारवाई

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वेच्या ई तिकिटांची काळाबाजारी करणाऱ्या आणि रेल्वे प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या ठिकठिकाणच्या १५ दलालांना रेल्वे सुरक्षा दलाने जेरबंद केले. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या विविध रेल्वे स्थानकांशी संबंधित दलालांविरुद्ध गेल्या महिनाभरात कारवाईची विशेष मोहिम राबविण्यात आली. त्यातून हे दलाल हाती लागले.

वेगवेगळे फंडे वापरून बनावट कागदपत्रांच्या आधारे दलाल रेल्वेचे ई तिकिट काढतात आणि गरजू प्रवाशांना प्रत्येक तिकिटावर पाचशे ते सातशे रुपये जास्त घेऊन ते विकतात, असा हा गोरखधंदा आहे. मोजक्या सिटस् असल्याने गरजू प्रवाशांना आरक्षित तिकिट मिळत नाही. त्यामुळे तो दलालाकडे वळतो आणि दलाल त्याचा गैरफायदा घेऊन एका प्रवाशांकडून मनमानी पद्धतीने वसुली करतो. अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात रेल्वे तिकिटांची काळाबाजारी होत असल्याच्या तक्रारी असल्यामुळे दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या आरपीएफचे वरिष्ठ सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांनी आपल्या सहकाऱ्यांना दलालांविरुद्ध कारवाईची विशेष मोहिम राबविण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार, जून महिन्यात ठिकठिकाणी छापे घालून १५ दलालांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून ई तिकिट काढण्यासाठी वापरण्यात येणारे कॉम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल जप्त करण्यात आले. सोबतच त्यांच्याकडून १५,९३४ रुपयांची नवीन ११ ई तिकिटे आणि यापूर्वी त्यांनी विकलेली ५ लाख, २३ हजार, ७९२ रुपयांची जुनी तिकिटेही जप्त करण्यात आली.      या ठिकाणी झाली कारवाई आरपीएफने ज्या ठिकाणी दलालांवर कारवाई केली ते रेल्वे स्थानक आणि दलालांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. ईतवारी - ५ दलाल, मोतीबाग ३ दलाल, छिंदवाडा १ दलाल, डोंगरगड २ दलाल, गोंदिया २ दलाल आणि नैनपूर २ दलाल.कारवाईची ही मोहिम अशीच सुरू राहणार असून, प्रवाशांनी रेल्वेच्या तिकिट काउंटर किंवा संकेतस्थळावरूनच तिकिट खरेदी करावे, असे आवाहन आयुक्त दीपचंद्र आर्य यांनी केले आहे.  

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे