शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

१४ हजारावर एलपीजीचे नवीन कनेक्शन्स रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 10:45 IST

रेशनकार्डची माहिती सादर करणाऱ्या अर्जदारालाच नवीन एलपीजी कनेक्शन देण्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा आदेश असल्यामुळे राज्यामध्ये १४ हजारावर नवीन एलपीजी कनेक्शन्स रखडले आहेत.

ठळक मुद्देरेशनकार्ड नसल्यामुळे मंजुरी नाही हायकोर्टाच्या आदेशाचा प्रभाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेशनकार्डची माहिती सादर करणाऱ्या अर्जदारालाच नवीन एलपीजी कनेक्शन देण्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा आदेश असल्यामुळे राज्यामध्ये १४ हजारावर नवीन एलपीजी कनेक्शन्स रखडले आहेत. संबंधित अर्जदारांकडे रेशनकार्ड नाहीत. परिणामी, त्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले नाहीत. प्रलंबित अर्ज १२ सप्टेंबर ते १९ आॅक्टोबर या कालावधीतील आहेत. केंद्र सरकारने सोमवारी उच्च न्यायालयाला ही माहिती दिली.राज्यातील हजारो कुटुंबे त्यांच्याकडे एलपीजी सिलेंडर असतानाही रेशनकार्डवरून रॉकेल उचलत आहेत. अशा कुटुंबांकडील रेशन कार्डवर ते एलपीजी सिलेंडरधारक असल्याची स्टॅम्पिंग नसल्यामुळे हा गैरप्रकार होत आहे. परिणामी, खऱ्या गरजू कुटुंबांना कमी रॉकेल मिळत आहे. या गैरप्रकारावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य सरकार रेशनकार्ड स्टॅम्पिंग करीत आहे. परंतु, हे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. ही बाब लक्षात घेता, न्यायालयाने रेशनकार्डची माहिती सादर करणाऱ्या अर्जदारालाच नवीन एलपीजी कनेक्शन देण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे रेशनकार्ड नसलेल्या ग्राहकांचे एलपीजी कनेक्शन मिळण्याचे अर्ज थांबवून ठेवण्यात आले आहेत. अशा अर्जांची वाढती संख्या लक्षात घेता रेशनकार्डच्या अटीचा आदेश मागे घेण्यात यावा, असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. त्यासाठी केंद्र सरकारने न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. संबंधित अर्जदारांकडून त्यांच्याकडे रेशनकार्ड नसल्याचे प्रतिज्ञापत्र व आधार क्रमांक घेऊन त्यांना एलपीजी कनेक्शन देण्याची परवानगी देण्यात यावी, अशी विनंती केंद्र सरकारने न्यायालयाला केली आहे. न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व श्रीराम मोडक यांनी सोमवारी यासह विविध मुद्दे ऐकून आवश्यक निर्णय देण्यासाठी प्रकरणावर मंगळवारी सुनावणी निश्चित केली. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते कडूजी पुंड यांची जनहित याचिका न्यायालयात प्रलंबित आहे. गरजू व्यक्तींना पुरेसे रॉकेल मिळावे, अशी त्यांची मागणी आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. फिरदोस मिर्झा, केंद्र सरकारतर्फे अ‍ॅड. उल्हास औरंगाबादकर तर, राज्य सरकारतर्फे अ‍ॅड. अनिल किलोर यांनी बाजू मांडली.

राज्य सरकारला आधारची माहिती देणार का?रेशनकार्ड नसलेल्या व नवीन एलपीजी कनेक्शन मागणाऱ्या अर्जदारांच्या आधार क्रमांकांची माहिती राज्य सरकारला देणार का? अशी विचारणा उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला करून, यावर मंगळवारी उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. रॉकेलची अवैध उचल थांबविण्यासाठी एलपीजी कनेक्शनधारक ओळखणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने सांगितले. 

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडर