शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus in Nagpur; नागपुरात एकाच दिवशी १४ पॉझिटिव्ह; रुग्णांची संख्या ४१

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 20:05 IST

एकाच दिवशी १४ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने, सर्वत्र खळबळ उडाली आहे. या रुग्णासह नागपुरात कोरोनाबाधितांची संख्या ४१ वर पोहचली आहे. धक्कादायक म्हणजे, नव्या वस्तीतील रुग्ण आढळून आल्याने धोका वाढला आहे.

ठळक मुद्देकामठी, जबलपूर व वेलकम कॉलनीतील पहिल्यांदाच आढळले रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकाच दिवशी १४ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने, सर्वत्र खळबळ उडाली आहे. या रुग्णासह नागपुरात कोरोनाबाधितांची संख्या ४१ वर पोहचली आहे. धक्कादायक म्हणजे, नव्या वस्तीतील रुग्ण आढळून आल्याने धोका वाढला आहे. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये जबलपूर येथील चार, सतरंजीपुऱ्यातील चार, वेलकम कॉलनी काटोल रोड येथील चार, मोमीनपुºयातील व कामठी येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे. यात मरकजहून आलेल्या चार रुग्णांचा समावेश आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन सर्वाेतोपरी प्रयत्न करीत आहे. परंतु काही नागरिक जाणीपूर्वक माहिती लपवून किंवा चुकीची माहिती देऊन यात अडथळे आणत आहे. काही लोकांपर्यंतच असलेला कोरोना विषाणू आता इतरांच्याही दारात पोहचला आहे. आतातरी सांगितलेल्या सूचनांचे पालन करा, महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन आरोग्य यंत्रणेतर्फे करण्यात आले आहे. -पॉझिटिव्ह नमुन्यामध्ये मेयोच्या प्रयोगशाळेतील सहा इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) प्रयोगशाळेत शनिवारी १२१ नमुने तपासण्यात आले. यातील सात रुग्णांचे नमुने शनिवारी मध्यरात्री तपासले असता यातील सहा नमुने पॉझिटिव्ह आले. यात दोन सतरंजीपुºयातील रहिवासी आहेत. उर्वरीत चार पॉझिटिव्ह नमुन्याचे रुग्ण जबलपूर येथील आहेत. हे मरकजहून नागपुरात आल्याचे सांगण्यात येते. या सहाही पुरुष रुग्णांना ३१ मार्च रोजी आमदार निवासात क्वारंटाइन करण्यात आले होते. यातील पहिल्या दोन रुग्णांना मेयोमध्ये स्थानांतरित करण्यात आले आहे. -मेडिकलच्या प्रयोगशाळेत आठ पॉझिटिव्ह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) प्रयोगशाळेत शनिवारी तपासण्यात आलेल्या नमुन्यांमधून नऊ नमुन्यांची मध्यरात्री पुन्हा तपासणी करण्यात आली. सकाळी आलेल्या अहवालात आठ नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यात चार पुरुष व चार महिला आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सतरंजीपुºयातील दोन पॉझिटिव्ह रुग्णापैकी एक मरकजहून आला होता. तर दुसरा रुग्ण घरातील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील आहे. वेलकम कॉलनी काटोल रोड येथील चार तर कामठी येथील एक या पॉझिटिव्ह रुग्णांची दिल्ली प्रवासाची पार्श्वभूमी आहे. मोमीनपुºयातील आढळून आलेला पॉझिटिव्ह रुग्ण हा बाधित रुग्णाच्या संपर्कातील आहे. यातील चार लोणारा येथे क्वारंटाइन होते तर उर्वरित चार हे मेडिकलमध्ये भरती होते.१६५ नमुने निगेटिव्ह मेयोच्या प्रयोगशाळेतआज रविवारी कोरोना संशयितांचे ४२ व न्यूमोनिया रुग्णाचे ३७असे एकूण ७९ नमुने तपासले. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (एम्स) ४५ तर मेडिकलने ४१ नमुने तपासले असता सर्वच म्हणजे, १६५ नमुने निगेटिव्ह आले आहेत. आरोग्य यंत्रणेला हे काहिसा दिलासा देणारे आहे. 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस