शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नागपुरातील उद्योगांमध्ये कार्यरत १४ कर्मचारी कोविड पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 00:02 IST

राज्य शासनाच्या परवानगीनंतर १ जूनपासून अनलॉक-१ मध्ये सुरू झालेल्या एमआयडीसी क्षेत्रातील उद्योगांमध्ये कार्यरत आणि क्षेत्रालगत राहणारे कर्मचारी कोविड-१९ पॉझिटिव्ह निघाले आहेत. उद्योगांमधील जवळपास ६० कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले असून त्यापैकी १४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

ठळक मुद्देउद्योजकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य शासनाच्या परवानगीनंतर १ जूनपासून अनलॉक-१ मध्ये सुरू झालेल्या एमआयडीसी क्षेत्रातील उद्योगांमध्ये कार्यरत आणि क्षेत्रालगत राहणारे कर्मचारी कोविड-१९ पॉझिटिव्ह निघाले आहेत. उद्योगांमधील जवळपास ६० कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले असून त्यापैकी १४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. हे संक्रमण हिंगणा एमआयडीसी क्षेत्रात पसरले आहे.जिल्ह्यातील अन्य उद्योगांमध्ये कोविड-१९ चे संक्रमण पसरण्याची शक्यता पाहता जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी महत्त्वपूर्ण बैठक बोलविली. यामध्ये सर्व उद्योगांना अटी आणि नियमांचे सक्तीने पालन करण्याचे निर्देश देण्यात आले. याकरिता विशेष कृती दलाची स्थापना करण्यात येणार आहे. कृती दल उद्योगांचे आकस्मिक निरीक्षण करणार आहे. यादरम्यान कोणताही कर्मचाऱ्यामध्ये कोविड-१९ ची लक्षणे आढळून आल्यास उद्योजकांना याची सूचना तहसील कार्यालयाला द्यावी लागेल. त्यानंतर संबंधित उद्योगात कोविड-१९ चे पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आल्यास उद्योग तीन दिवसासाठी बंद करण्यात येणार आहे.लॉकडाऊनदरम्यान नागपूर जिल्ह्यातील उद्योजकांनी जिल्हा प्रशासनाला नेहमीच सहकार्य केले आहे. यासोबतच शासकीय अटी आणि नियमांचे पालन केले आहे. नागपूर जिल्ह्यातील जवळपास २५०० उद्योग ५० ते ६० टक्के क्षमतेने काम करीत आहेत. प्रवासी मजूर न परतल्यास उद्योगांमध्ये मजूरांची कमतरता भासणार आहे. परंतु उद्योजकांतर्फे स्थानिक मजुरांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात येत आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहसंचालक (उद्योग), डीआयसी महाव्यवस्थापक रोजगार कार्यालय आणि कौशल्य विकास विभाग आवश्यक सहकार्य करीत आहे.एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रशेखर शेगांवकर, बुटीबोरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप खंडेलवाल, कळमेश्वर इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अमर मोहिते आणि विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन अध्यक्ष सुरेश राठी यांनी सर्व उद्योजकांना अटी आणि नियमांचे सक्तीने पालन करण्याचे आवाहन केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर