शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, काँग्रेसला १ नंबर पक्ष बनवा”: सपकाळ
3
बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम?
4
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद
5
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला 'ईडी'कडून समन्स; अडचणी वाढणार? प्रकरण काय...
6
पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी मोठा 'धमाका' करण्याच्या तयारीत रशिया; अमेरिकेलाही धडकी भरणार, संपूर्ण जग नुसतं बघतच बसणार!
7
WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
8
'या' कारणाने लक्षात राहिली 'राऊडी राठोड'ची ऑडिशन; भार्गवी चिरमुले म्हणाली, 'त्यांनी मला..."
9
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका
10
DRDOचा गेस्ट हाऊस मॅनेजर करत होता आयएसआयसाठी हेरगिरी; राजस्थानच्या सीआयडीने केली अटक
11
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! आता बचत खात्यात 'इतके' पैसे ठेवावे लागणार, नाहीतर बसणार दंड!
12
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
13
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
14
जेठालालपेक्षाही साधा भोळा आहे दयाबेनचा रिअल लाइफ नवरा, काय करतो माहितीये का?
15
तानाजी गळगुंडेला 'सैराट'साठी मिळालेलं इतक्या हजार रुपयांचं मानधन, स्वतःवर खर्च न करता दिले मित्राला
16
पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना! पत्नीच्या नावावर FD करुन मिळवा बँक एफडीपेक्षा जास्त परतावा!
17
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
18
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
19
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
20
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 

तीन वर्षात १३५ पोलिसांवर हल्ले

By admin | Updated: September 18, 2016 02:27 IST

कुठे वाहनाने उडवून देण्याचा प्रयत्न तर कुठे पाण्यात बुडवून ठार मारण्याचा प्रयत्न,

आठ महिन्यात हल्ल्याचे २६ गुन्हे : बारंगे प्रकरणाने पोलिसांमध्ये रोषनरेश डोंगरे  नागपूरकुठे वाहनाने उडवून देण्याचा प्रयत्न तर कुठे पाण्यात बुडवून ठार मारण्याचा प्रयत्न, कुठे दगडफेक तर कुठे मारहाण असे पोलिसांवरील हल्ल्यांचे प्रकार वाढल्याने राज्य पोलीस दलात प्रचंड रोष आहे. या पार्श्वभूमीवर, नागपुरात एका दारुड्या वाहनचालकाने शुक्रवारी रात्री कर्तव्यावरील एका पोलीस हवालदाराला हेल्मेट आणि दगडाने ठेचून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याने पोलीस दलातील खदखद तीव्र झाली आहे. गेल्या आठ महिन्यात नागपुरात पोलिसांवर हल्ल्याच्या २६ घटना घडल्या. तीन वर्षांत पोलिसांवरील हल्ल्याच्या गुन्ह्यांचा आकडा १३५ एवढा आहे. शिस्तीचे दल म्हणून पोलिसांना उघड बोलण्याची मुभा नाही. परंतु, शुक्रवारच्या या घटनेने पोलिसांच्या रोषाचा भडका उडण्याची भीती निर्माण केली आहे. नागरिकांच्या जानमालाची सुरक्षा सांभाळण्याची मुख्य जबाबदारी पेलणारे पोलीस अलीकडे कमालीचे असुरक्षित झाले आहेत. त्याला अनेक कारणे असली तरी खाबुगिरीसाठी चटावलेली वृत्ती अन् उर्मटपणा या दोन मुख्य बाबी पोलिसांवरील हल्ल्याला कारणीभूत आहेत. अर्थात सर्वच पोलीस खाबुगिरीसाठी चटावलेले असतात किंवा सर्वच पोलीस उर्मट असतात असेही नाही. मात्र, सौजन्याच्या अभावामुळेच पोलिसांवरील हल्ल्याचे प्रकार वाढल्याची चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे. रात्री बेरात्री निर्जन रस्त्यावरून जाताना माणसाचा जीव धाकधूक करतो. कुठे एखादा पोलीस किंवा पोलिसांचे वाहन जरी दिसले तरी पुढच्या एक-दोन किलोमिटरपर्यंत भीती वाटत नाही. असे असूनदेखील पोलिसांशी वाद घातल्याचे, त्याची कॉलर पकडल्याचे, धक्काबुक्की केल्याचे अन् मारहाण केल्याचे गुन्हे घडतच असतात. यावर्षी जानेवारी ते सप्टेंबरपर्यंत सीताबर्डीत ४ गुन्हे, जरीपटक्यात ३, नंदनवनमध्ये ३, सदर, पाचपावली, कळमना, गिट्टीखदानमध्ये अनुक्रमे २ गुन्हे, तर, तहसील, प्रतापनगर, अंबाझरी, गणेशपेठ, शांतिनगर, सक्करदरा, अजनी या पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक असे एकूण २५ गुन्हे नोंदवण्यात आले. यातील सर्वाधिक गुन्हे वाहतूक शाखेच्या पोलिसांसोबत झालेल्या बाचाबाचीनंतर नोंदविण्यात आले. त्यामुळे पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल करण्यापूर्वी बरेच विचारमंथन झाले. त्यानंतर पोलीस कायद्याचा दुरुपयोग करून गुन्हे दाखल करतात, दडपशाही करतात, असा आरोप करणाऱ्या तक्रारी होऊन नाराजीचा सूरही निघाला. सर्वाधिक गुन्हे २०१४ मध्येजीवघेण्या हल्ल्यासोबतच पोलिसांना मारहाण करण्याच्या, शिवीगाळ करून धमकी देण्याच्या घटना नागपुरात नवीन नाही. २०१४ मध्ये अशा प्रकारचे ६१ गुन्हे दाखल झाले होते. २०१५ मध्ये पोलिसांवरील हल्ल्याचा आकडा ४८ वर आला. आता साडेआठ महिन्यात २६ गुन्हे दाखल झाले. त्यापैकी ६ गुन्हे जानेवारी महिन्यात, फेब्रुवारी -१, मार्च-४, एप्रिल ४, मे -०, जून ३, जुलै-३ आॅगस्ट २ आणि १५ सप्टेंबरपर्यंत ३ गुन्हे, अशी ही पोलिसांवरील हल्ल्याची आकडेवारी आहे.