शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

१३५ किमीची ‘ट्रिपल मॅरेथॉन’ : शहिदांना तरुणाईची आगळीवेगळी श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 22:52 IST

जोश, उत्साह, नवचैतन्य असे तरुणाईबद्दल म्हटले जाते. दुसरीकडे याच तरुणाईला भरकटलेली तरुणाई म्हणून सन्मानाची वागणूकही मिळत नाही. परंतु अशा बिरुदापासून स्वत:ला दूर ठेवून काहीतरी आगळेवेगळे करण्याची जिद्द तरुणाईमध्येच असते. असाच एक आगळावेगळा उपक्रम उपराजधानीतील काही तरुणांनी राबविला. चक्क १३५ किमीच्या ‘ट्रिपल मॅरेथॉन’ (तीन दिवस) मध्ये सहभागी होऊन शहीद जवानांना श्रद्धांजली देत विंग कमांडर अभिनंदन यांना सलामी दिली.

ठळक मुद्देनागपूर ते देवरीपर्यंत तीन दिवसांत ‘रण’

गणेश खवसे/लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जोश, उत्साह, नवचैतन्य असे तरुणाईबद्दल म्हटले जाते. दुसरीकडे याच तरुणाईला भरकटलेली तरुणाई म्हणून सन्मानाची वागणूकही मिळत नाही. परंतु अशा बिरुदापासून स्वत:ला दूर ठेवून काहीतरी आगळेवेगळे करण्याची जिद्द तरुणाईमध्येच असते. असाच एक आगळावेगळा उपक्रम उपराजधानीतील काही तरुणांनी राबविला. चक्क १३५ किमीच्या ‘ट्रिपल मॅरेथॉन’ (तीन दिवस) मध्ये सहभागी होऊन शहीद जवानांना श्रद्धांजली देत विंग कमांडर अभिनंदन यांना सलामी दिली.नागपूर ते देवरी असे १३५ किमीची ट्रिपल मॅरेथॉनला शनिवारी (दि. ९) हिरवी झेंडी दाखविण्यात आली. ‘टीम अपार’ने हा उपक्रम राबविला असून पारडी (नागपूर) येथील भवानी माता मंदिरापासून ही चमू देवरीच्या दिशेने रवाना झाली. पहिल्या दिवशी ‘टीम अपार’मधील सहभागी पाच सदस्य भंडाऱ्यापर्यंत पोहोचले. रविवारी भंडारा ते साकोलीपर्यंतचा टप्पा गाठला जाणार असून सोमवारी साकोली ते देवरीपर्यंतचे अंतर कापले जाणार आहे.पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली देण्यासाठी असा हा आगळावेगळा उपक्रम राबविण्याचे धाडस केल्याचे ‘टीम अपार’चे मंथन पटले याने सांगितले. सोबतच विंग कमांडर यांच्या शौर्याचे कौतुक करण्यासाठीही हा उपक्रम घेण्यात असल्याचे त्याने सांगितले. या उपक्रमात मंथन पटले याच्यासोबतच अपूर्व नायक, शत्रुघ्न पटले, रिना ठोसर सहभागी झालेले आहेत. या ‘ट्रिपल मॅरेथॉन’ दरम्यान मार्गातील प्रत्येक पोलीस पोलीस स्टेशनला चमू भेट देत आहे. नागपूर येथे या मॅरेथॉनला हिरवी झेंडी दाखविली त्यावेळी निशिकांत काशीकर, वैभव अंधारे, पंकज दहीकर, देवेंद्र वैद्य, चेतन नासरे, कुलदीप परीमल, सिंधू सोनी, सुरेश लांगे आदी उपस्थित होते. कॅन्डल मार्च, मौन वा इतर प्रकारांपेक्षा सैनिकांना त्यांच्याच ‘स्टाईल’मध्ये श्रद्धांजली देण्यासाठी हा उपक्रम राबवित असल्याचे ‘टीम अपार’च्या सदस्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.उपक्रमांसोबतच जनजागृती‘टीम अपार’ने आतापर्यंत अनेक आगळेवगळे उपक्रम राबवित जनजागृती केली आहे. तीन वर्षांपूर्वी याच चमूने नागपूर ते रायपूर महामार्गालगत ५०० वृक्ष लागवड केली. नागपूर ते नाशिक सायकल रॅली काढून साक्षरता जनजागृती केली. या दोन्ही उपक्रमांची नोंद ‘इंडिया बुक रेकॉर्ड’मध्ये करण्यात आली. नागपूर ते काठमांडू (नेपाळ) पर्यंत आणि त्यानंतर देशभरात १० हजार किमीचा प्रवास केवळ १५ दिवसांत बाईक रॅलीने करीत ‘लेक वाचवा, लेक शिकवा’बाबत जनजागृती केली. त्याची नोंद ‘एशिया बुक रेकॉर्ड’मध्ये करण्यात आली. यानंतर नागपूर ते नेपाळपर्यंत ‘लेक वाचवा, लेक शिकवा’साठीच सायकल रॅली काढण्यात आली. यासोबतच प्रदूषणाविरोधातही या चमूने जनजागृती केली. नागपूर ते हुगळीपर्यंतचा मोटरसायकलने प्रवास करीत हेल्मेट आणि वाहतूक नियमांबाबत जनजागृतीची मोहीम या चमूने राबविली.

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाMarathonमॅरेथॉन