शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर शहरात वैयक्तिक शौचालयाचे १३४३० लाभार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 23:10 IST

नागपूर शहरात १३४३० वैयक्तिक शौचालयांचे निर्माण करण्यात आले आहे. यामुळे हागणदारीमुक्त शहराच्या वाटचालीला नवी दिशा मिळाली आहे.

ठळक मुद्देमनपाचा स्वच्छता अभियानात पुढाकार : गरीब कुटुंबांना मिळाला दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिकेतर्फे शहरात जनजागृती मोहीम राबवून गरीब कुटुंबांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून सांगितले आहे. तसेच शहरात १३४३० वैयक्तिक शौचालयांचे निर्माण करण्यात आले आहे. यामुळे हागणदारीमुक्त शहराच्या वाटचालीला नवी दिशा मिळाली आहे.तसेच शहरात मोठ्या प्रमाणात वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयांचे निर्माण केल्याने महापालिका ओडीएफ प्लस प्लसच्या मानांकनासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली.राज्य सरकारने नागपूर शहराला यापूर्वीच हागणदारीमुक्त घोषित केले आहे. शहरात स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरात वैयक्तिक शौचालय निर्माण करण्यासाठी २४ हजार २८४ अर्जप्राप्त झाले होते. यातील १३,४३० पात्र लाभार्थ्यांना शौचालयासाठी अनुदान देण्यात आले आहे.शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये २० सामूहिक शौचालयाचे निर्माण करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त शहरात ६८ सार्वजनिक शौचालये उभारण्यात आलेली आहे. पाच शौचालयाचे कार्य प्रगतिपथावर आहे. वर्दळीच्या जागी ही शौचालये उभारली जात आहे. याते नेताजी मार्केट, बुधवार बाजार, गोकुळपेठ, भाजीमंडई, फुले बाजार, मेहाडिया चौक याठिकाणी सुलभ शौचालयाचे निर्माण करण्यात आले आहे. शहरात सार्वजनिक शौचालयाचे नियंत्रण हे सुलभ शौचालय प्रकल्पांतर्गत करण्यात आले आहे. सामूहिक शौचालयाची स्वच्छता ब्रिस्क या कंपनीकडे आहे.कचऱ्याचे ओला व सुका असे वर्गीकरण झाले तर, कचरा डेपोमध्ये कचऱ्याचे ढीग वाढणार नाही. कचरा डेपोमध्ये कचरा साठल्याने मिथेन गॅस निर्माण होते. यामुळे कचऱ्याला आग लागते व धूर पसरून प्रदूषण वाढते. वर्गीकरण केल्यास कचऱ्याची लगेच विल्हेवाट लावणे सोयीचे होईल. अशी माहिती आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.कचरा वर्गीकरण करूनच संकलित कराशहरातील नागरिकांना कचरा संकलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे ओला व सुका कचरा वर्गीकरण करून द्यावा. पर्यावरण संवर्धनासाठी कचरा वर्गीकरण आवश्यक आहे. ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती केली जाते. सुका कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. त्यामुळे ओला व सुका कचरा वेगवेगळा करूनच संकलन करणाऱ्याकडे द्यावा, असे आवाहन राम जोशी, आरोग्य अधिकारी (स्वच्छता)डॉ. सुनील कांबळे व स्वच्छ भारत अभियानाचे नोडल अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार यांनी केले आहे.स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे आवाहनशहरातील स्वच्छतेसंदर्भात कुठलीही तक्रार करण्यासाठी केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता अ‍ॅप तयार केले आहे. या अ‍ॅपकडे तक्रार केली तर १२ तासात तक्रारीचे निराकरण होईल. नागरिकांनी हा अ‍ॅप डाऊनलोड करावा, असे आवाहन राम जोशी यांनी केले आहे. स्वच्छ मंच या पोर्टलवर संस्थांनी व वैयक्तिक पर्यावरणाशी संबंधित कार्य व त्याचे फोटो अपलोड करता येतात.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाcivic issueनागरी समस्या