शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

वर्षभरात १.३२ लाख नवीन वीज जोडण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 01:16 IST

वीज ग्राहकांना योग्य दाबाने व अखंडित वीजपुरवठा व्हावा, यासाठी महावितरणे विदर्भात तब्बल ११७ वीज उपकेंद्रे प्रस्तावित केलेली आहेत; त्यापैकी २९ उपकेंद्रांची कामे पूर्ण झाली आहेत.

ठळक मुद्देमहावितरणचा प्रभावी ग्राहकसेवेचा दावा : वर्षभरात उभारली २९ उपकेंद्रे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वीज ग्राहकांना योग्य दाबाने व अखंडित वीजपुरवठा व्हावा, यासाठी महावितरणे विदर्भात तब्बल ११७ वीज उपकेंद्रे प्रस्तावित केलेली आहेत; त्यापैकी २९ उपकेंद्रांची कामे पूर्ण झाली आहेत. अनेक भागातील वीजपुरवठ्याच्या समस्या निकाली लागल्या आहेत. गेल्या वर्षभरात सुमारे १.३२ लाख नवीन वीज जोडण्या देण्यात आल्याची माहिती महावितरणच्या प्रादेशिक संचालक कार्यालयाने दिली.वीज ग्राहकांना लहानसहान कामांसाठी वारंवार मुंबईला जाण्याची गरज भासू नये, अनेक प्रकारच्या प्रस्तावांना स्थानिकस्तरावरच मंजुरी मिळावी, यासाठी महावितरणच्या कामांचे विकेंद्रीकरण करण्याची संकल्पना राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्यक्षात अंमलात आणली. त्यांच्या पुढाकाराने २ आॅक्टोबर २०१६ पासून संपूर्ण विदभार्साठी नागपूर येथे प्रादेशिक संचालक कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला. एक वर्षाच्या कार्यकाळात या कार्यालयाने प्रभावी आणि तत्पर ग्राहकसेवेसाठी विविध उपक्रम हाती घेतले.ग्राहकांशी प्रत्यक्ष संवाद वाढवून त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यावर विशेष भर दिला. महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करीत, प्रादेशिक संचालक कार्यालयाने पहिल्या वर्षातच ग्राहकसेवेमध्ये यशाचे उंच शिखर गाठले. विदर्भात महावितरणचे सुमारे ४७ लाख वीज ग्राहक असून, त्यापैकी तब्बल ७० टक्के वीज ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी केली. ग्राहकांच्या तक्रारींचे थेट निराकरण करण्यासोबतच त्यांनी केलेल्या विजेचा मासिक वापर, वीज देयक, वीज खंडित होणार असल्याच्या सूचनेसोबतच अनेक महत्त्वाची माहिती थेट एसएमएसच्या माध्यमातून दिली जाते.ग्राहकांना अचूक वीजबिल मिळावे यासाठी विदभार्तील अडीच हजारांपेक्षा अधिक उच्चदाब ग्राहकांना स्वयंचलित मीटर वाचन पद्धतीने नोंदी घेत वीजबिल दिल्या जाते. लघुदाब औद्योगिक ग्राहकांसाठीही ही पद्धत नुकतीच सुरू करण्यात आली आहे. याशिवाय महावितरणच्या मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून लघुदाब ग्राहकांचे मीटर वाचन होत आहे. त्यात मानवी हस्तक्षेप पूर्णपणे नाहीसा करण्यात महावितरणला विशेष यश मिळाले आहे. एखाद्या ग्राहकाच्या मीटरचे वाचन काही कारणास्तव झाले नसल्यास ग्राहकाला स्वत: आपल्या मीटरचा फोटो पाठविण्याची सुविधाही या अ‍ॅपमध्ये उपलब्ध आहे.विदर्भातील शेततळ्यांमधील पाण्याचा उपसा करण्यास योग्य दाबाने वीजपुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी पूर्व विदर्भ स्पेशल पॅकेज अंतर्गत तब्बल ७०० कोटींची योजना मंजूर झाली असून त्यापैकी ३५० कोटींची कामेही प्रस्तावित करण्यात आली आहेत.शहरी भागातील वीज वितरण यंत्रणा बळकटीकरणासाठी एकात्मिक विद्युत विकास योजना आणि ग्रामीण भागासाठी दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजनेंतर्गत प्रादेशिक संचालक नागपूर यांच्या कार्यक्षेत्रात मोठ्याप्रमाणात विकासकार्ये सुरू असून त्यापैकी अनेक कामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. महावितरणचा एकूणच आर्थिक डोलारा लक्षात घेता वीज ग्राहकांनीही अधिकृत विजेचा वापर करून नियमितपणे वीजबिलांचा भरणा करावा, असे आवाहन प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी केले आहे.