शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
4
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
5
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
6
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
7
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
8
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
9
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
10
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
11
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
12
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
13
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
14
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
15
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
16
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
17
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
18
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
19
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
20
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!

१३१ महाविद्यालयांवर प्रवेशबंदीची कुऱ्हाड

By admin | Updated: June 6, 2017 01:46 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील १३१ महाविद्यालयांवर प्रवेशबंदी लावण्यात आली आहे.

संलग्नीकरणासाठी अर्जच नाही : ‘एलईसी’साठी पुढाकार नाहीलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील १३१ महाविद्यालयांवर प्रवेशबंदी लावण्यात आली आहे. संलग्नीकरणासाठी अर्ज न करणे तसेच ‘एलईसी’ (लोकल इन्क्वायरी कमिटी) म्हणजेच स्थानिक चौकशी समितीची प्रक्रिया न राबविणे या महाविद्यालयांना महागात पडले आहे. यातील १०१ महाविद्यालयांची यादी विद्यापीठाने संकेतस्थळावरच जारी केली आहे. या महाविद्यालयांच्या कुठल्याही वर्षाला विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे या यादीमध्ये शिक्षणसम्राटांच्यादेखील काही महाविद्यालयांचा समावेश आहे.नागपूर विद्यापीठात ६०१ संलग्नित महाविद्यालये आहेत. यातील ११९ महाविद्यालयांनी गेल्या तीन वर्षांपासून संलग्नीकरण सुरू राहावे किंवा नूतनीकरणासाठी अर्ज सादर केलेले नाहीत. यातील अनेक महाविद्यालये अनेक वर्षांपासून केवळ कागदांवरच आहेत. नागपूर विद्यापीठाने वारंवार या महाविद्यालयांशी पत्रव्यवहार केला. मात्र काहीही उत्तर मिळाले नाही. १८ महाविद्यालये बंद करण्याचे प्रस्ताव विद्यापीठाकडे आले. मात्र इतर ठिकाणाहून काहीच संपर्क न झाल्यामुळे १०१ महाविद्यालयांवर तत्काळ प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. या महाविद्यालयांत विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नयेत. सध्या प्रवेशाची धावपळ सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी योग्य चाचपणी करूनच प्रवेश घ्यावेत, असे आवाहन प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी केले.‘त्या’ महाविद्यालयांवरदेखील कारवाईदरम्यान, नागपूर विद्यापीठातील ७४ संलग्नित महाविद्यालयांनी स्थानिक चौकशी समितीच्या प्रक्रियेसाठी कुठलाही पुढाकार घेतला नव्हता. विद्यापीठाने या महाविद्यालयांना नोटीस बजावली होती. यातील ३० महाविद्यालयांनी नोटीस प्राप्त झाल्यानंतरदेखील कुठलेच पाऊल उचलले नाही. या महाविद्यालयांवरदेखील प्रवेशबंदी लावण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. विद्यापीठात नियमांनुसार प्राध्यापक तसेच इतर सोईसुविधा आहेत की नाही याची तपासणी करण्यासाठी विद्यापीठातर्फे स्थानिक चौकशी समिती नेमण्यात येते. महाविद्यालयांना संबंधित समितीला बोलवावे लागते. वरील महाविद्यालयांनी यासंदर्भात कुठलीही हालचाल केली नव्हती. या महाविद्यालयांची यादीदेखील संकेतस्थळावर टाकण्यात येणार आहे.