शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

वनविभाग, बीएसएनएल व एजी ऑफिसचे १३ टक्के कर्मचारी आहेत 'वजनदार'

By सुमेध वाघमार | Updated: July 13, 2023 19:09 IST

Nagpur News वनविभाग, बीएसएनएल व एजी ऑफिसचा शासकीय कर्मचाऱ्यांचा लठ्ठपणाची तपासणी केली असता तब्बल १३ टक्के कर्मचारी लठ्ठ तर, ३९ टक्के कर्मचारी लठ्ठपणाचा वाटेवर असल्याचे आढळून आले.

सुमेध वाघमारे नागपूर : इंदिरा गांधी शासीकय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्यावतीने (मेयो) ‘स्थूलपणा नियंत्रण व उपचार’ अभियानांतर्गंत वनविभाग, बीएसएनएल व एजी ऑफिसचा शासकीय कर्मचाऱ्यांचा लठ्ठपणाची तपासणी केली असता तब्बल १३ टक्के कर्मचारी लठ्ठ तर, ३९ टक्के कर्मचारी लठ्ठपणाचा वाटेवर असल्याचे आढळून आले.

     वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्यावतीने या अभियानांतर्गत मेयोचे अधिष्ठाता डॉ. संजय बीजवे यांच्या मार्गदर्शनात वनविभाग कार्यालय व ‘बीएसएनएल’ व महालेखाकारकार्यालय (एजी ऑफीस) या शासकीय कार्यालयांमध्ये २० ते २३जून रोजी लठ्ठपणा जागृती व निदान व तसेच रक्तदाब व मधुमेह निदान शिबिर आयोजित केले होते. त्याचा धक्कादायक अहवाल आता प्राप्त झाला आहे. मेयोने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, या तिन्ही कार्यालयाचे मिळून एकूण २९१ कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यात १३ टक्के म्हणजे, २८ कर्मचारी लठ्ठ आढळून आले. ३९ टक्के म्हणजे, ११५ कर्मचाऱ्यांची लठ्ठपणाकडे वाटचाल सुरू असल्याचे दिसून आले. अपेक्षेपेक्षा कमी वजनाचे २ कर्मचाऱ्यांचीही नोंद झाली. 

- कर्मचाऱ्यांमध्ये वाढतोय मधुमेहया अभियानांतर्गंत कर्मचाऱ्यांची मधुमेह व रक्तदाबाचीही तपासणी करण्यात आली. यात १३.४ टक्के म्हणजे ३९ कर्मचाऱ्यांमध्ये मधुमेहाचे निदान झाले. शिवाय, ९.२५ टक्के म्हणजे २७ कर्मचाऱ्यांना उच्चरक्तदाब असल्याचे आढळून आले.