शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

पिढ्यानपिढ्या नदीकाठावर होणारे अंत्यसंस्कार थांबणार कधी ?

By गणेश हुड | Updated: June 14, 2023 16:47 IST

जिल्ह्यातील १२३ गावात स्मशानभूमी नाही 

नागपूर : शहरांचा विकास होत आहे. दुसरीकडे ग्रामीण भागात अजूनही मुलभूत सुविधांचा अभाव आहे. रस्ते, पाणीपुरवठा, गटर लाईन, पथदिवे अशा मुलभूत सुविधा नाही. एवढेच नव्हे तर नागपूर जिल्ह्यातील १२३ गावांमध्ये स्मशानभूमी, दहन शेड नाही. यासाठी शेकडो कोटींचा निधी लागणार नाही. परंतु प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे ग्रामीण भागातील स्मशानभूमीची समस्या अजूनही कायम आहे.  

स्मशानभूमी नसल्याने तेथील रहिवाशांना उघड्यावर, नदी काठावर  मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागतात.  काही  गावातील लोक नजिकच्या गावात अंत्ययात्रा नेवून अंत्यसंस्कार करतात. माहितीनुसार जी जागा वनविभागाची आहे. अशा जागी वनहक्क कायदा कलम ३/१नुसार निस्तार हक्क प्रमाणे मुकर्रर केल्या जाऊ शकते. तीन पिढ्यांपेक्षा जास्त काळ त्याच ठिकाणी दहन विधी होत असेल तर अशी गावची जागा दहनविधीसाठी निस्तार हक्काप्रमाणे मुकर्रर करता येते. या ठिकाणी स्मशान भूमीचे बांधकाम शक्य आहे. इच्छाश्क्तीचा अभाव

जिल्ह्यातील १२३ गावांमध्ये स्मशानभूमीची व्यवस्था नाही. यातील काही गावांमध्ये जागा उपलब्ध आहे. तर काही ठिकाणी जागा उपलब्ध नाही. तर कुठे जागा उपलब्ध असून ती झुडपी जंगलाची जागा आहे. स्मशानभूमीसाठी शासकीय जागा असणे आवश्यक आहे. परंतु अशी जागा उपलब्ध नसल्यास जन सुविधा निधीतून जमीन खरेदी करण्यासाठी त्या गावाला एकदा २० लाखाचे अर्थसहाय्य देण्यात येते. करावयाचेच असेल तर पर्याय निघतात. परंतु इच्छा शक्तीचाच अभाव दिसतो. 

 स्मशानभूमी नसलेली गावे

तालुका - गावांची संख्यानागपूर - १०कामठी - २हिंगणा - १२काटोल - १७नरखेड - ११सावनेर - ७कळमेश्वर - ११रामटेक - १२पारशिवणी - ९मौदा - ५उमरेड - ७भिवापूर - ९कुही - ११

टॅग्स :localलोकलnagpurनागपूर