हॉटेल, रेस्टॉरन्ट व बारला व्यवसायात १२०० कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2020 09:09 AM2020-10-07T09:09:41+5:302020-10-07T09:11:20+5:30

Hotel, Corona, Nagpur News जवळपास सहा महिन्यात व्यापाऱ्यांना १२०० कोटींच्या व्यवसायाचा फटका बसल्याची माहिती व्यावसायिकांनी दिली.

1,200 crore hit hotel, restaurant and bar business | हॉटेल, रेस्टॉरन्ट व बारला व्यवसायात १२०० कोटींचा फटका

हॉटेल, रेस्टॉरन्ट व बारला व्यवसायात १२०० कोटींचा फटका

Next
ठळक मुद्देलॉकडाऊनमुळे आर्थिक संकटव्यवसाय सुरळीत होण्यास दोन महिने लागणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य शासनाच्या २० मार्च आणि केंद्र सरकारच्या २५ मार्चच्या लॉकडाऊननंतर नागपूर शहरातील सर्वच हॉटेल, रेस्टॉरन्ट, बार आणि भोजनालयाचे व्यवहार ठप्प झाले. या सर्वांची वर्षभरात २५०० कोटींपेक्षा जास्तची उलाढाल होते. जवळपास सहा महिन्यात व्यापाऱ्यांना १२०० कोटींच्या व्यवसायाचा फटका बसल्याची माहिती व्यावसायिकांनी दिली.

५० टक्केच हॉटेल, रेस्टॉरन्ट सुरू
नागपूर रेशिडेन्शियल हॉटेल्स आणि रेस्टॉरन्ट असोसिएशनचे अध्यक्ष तेजिंदरसिंग रेणू म्हणाले, उपरोक्त व्यवसायावर जवळपास ४० हजार लोकांचा व्यवसाय चालतो. लॉकडाऊननंतर सर्वच व्यवसाय बंद झाल्याने कर्मचारी स्थलांतरित झाले तर काही भाजी विक्रीचा व्यवसाय करू लागले. ५ आॅक्टोबरपासून सर्वच व्यवसाय सुरू झाल्यानंतर कामगार अजूनही कामावर परत आलेले नाहीत. त्यामुळे नागपुरात ५० टक्केच हॉटेल, रेस्टॉरंट आणि भोजनालय सुरू झाले आहेत. याशिवाय बहुतांश बारमध्ये किचन सुरू झालेले नाही. पुढे येणाºया दसरा-दिवाळी सणानंतर अर्थात दोन महिन्यानंतरच व्यवसाय सुरळीत होतील. नागपुरात लहानमोठे अडीच ते ३ हजार बार, रेस्टॉरंट, हॉटेल आणि भोजनालये आहेत. त्यात मोठे हॉटेल्स जवळपास १५ आहेत. सध्या आंतरराष्ट्रीय विमान सेवा आणि पूर्ण क्षमतेने घरगुती विमानसेवा, रेल्वे सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे हॉटेल्सचा व्यवसाय अजूनही ठप्प आहे.

वेळेचा अजूनही संभ्रम
रेणू म्हणाले, राज्य शासनाने परवानगी दिली तरीही हॉटेल, रेस्टॉरंट व बार सुरू ठेवण्याच्या वेळेची गाईडलाईन अजूनही आलेली नाही. पण मालकांनी कोरोना नियमांचे पालन करून व्यवसाय सुरू केले आहेत. पहिल्या दिवशी पोलिसांनी ९ वाजता बंद करण्यास सांगितले. नागपुरात रेस्टॉरंटमध्ये ग्राहक रात्री ८ नंतर येतात. रात्री ११ पर्यंत प्रतिष्ठाने खुली ठेवण्यास परवानगी द्यावी.

वेळेची समस्या
पहिल्या दिवशी सदर अणि सीताबर्डी भागात पोलिसांनी प्रतिष्ठाने ९ वाजता बंद करण्यास सांगितली होती. मुंबईत रात्री १२.३० पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. नागपुरात किमान ११ वाजेपर्यंत सुरू ठेवावीत. या संदर्भात प्रशासनाने नियमावली जाहीर करावी.
स्वप्नील अहिरकर, हॉटेल व्यावसायिक़

 

Web Title: 1,200 crore hit hotel, restaurant and bar business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :hotelहॉटेल