शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात परवाना धारकांकडून १२० शस्त्र जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 21:16 IST

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूक कालावधीत भारत निवडणूक आयोगाने शस्त्र बाळगण्यावरील निर्बधानुसार तसेच आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे जिल्ह्यातील परवानाधारकांकडून १२० शस्त्रे जमा करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांची माहिती 

लोकतम न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूक कालावधीत भारत निवडणूक आयोगाने शस्त्र बाळगण्यावरील निर्बधानुसार तसेच आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे जिल्ह्यातील परवानाधारकांकडून १२० शस्त्रे जमा करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली.लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच निवडणूक निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या अध्यक्षतेखाली छाननी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी रवींद्र कुंभारे उपस्थित होते.जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली असून निवडणूक कालावधीमध्ये शस्त्र अथवा हत्यारे यांचा गैरवापर होऊ नये तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्ह्यातील परवानाधारकांना शस्त्रे जमा करणे आवश्यक असल्याने नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील शस्त्र संबंधित पोलीस स्टेशन येथे जमा करून घेण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार १२० शस्त्र जमा करून घेण्यात आली आहेत. उर्वरित परवानाधारकांची पडताळणी करण्यात आली असून बंदोबस्तासाठी असणारे अधिकारी, कर्मचारी तसेच बँक व सार्वजनिक मालमत्तेच्या सुरक्षेसाठी नेमण्यात आलेल्या सुरक्षा कर्मचारी यांना वगळण्यात आले आहे. परंतु या सर्व सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून शस्त्राचा गैरवापर होणार नाही, याची संपूर्ण जबाबदारी संबंधित बँक तसेच संस्थेच्या अधिकाऱ्यांची राहील असेही जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNagpur Collector Officeनागपूर जिल्हाधिकारी कार्यालय