शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
3
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
4
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
5
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
6
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले
7
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
8
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा
9
Navratri 2025: वडापावची क्रेव्हिंग होतेय? झटपट करा 'हा' उपासाचा कुरकुरीत बटाटेवडा
10
काय सांगता? स्लिम होण्याचा ट्रेंड जीवघेणा; बारीक लोकांमध्ये अकाली मृत्यूचा धोका तिप्पट
11
नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत
12
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
13
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
14
Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!
15
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
16
नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
17
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
18
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
19
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
20
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

बारा वर्षाच्या मुलाने लावला गळफास... नेमके काय घडले होते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 20:34 IST

१२ वर्षाच्या बालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी ११.३० वाजता नंदनवनच्या शिवणकर नगरात घडली. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

ठळक मुद्देतो अभ्यासात सामान्य होता. त्याला मोबाईलवर गेम किंवा इतर खेळ खेळण्याची सवय नव्हती.

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : १२ वर्षाच्या बालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी ११.३० वाजता नंदनवनच्या शिवणकर नगरात घडली. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. (12-year-old boy strangled to death; What could have caused this?)

अजय सुधीर जांभूळकर (१२) असे मृत बालकाचे नाव आहे. अजय हसनबागच्या आदर्श हायस्कूलमध्ये आठवीला शिकत होता. कुटुंबात आई-वडील आणि लहान बहीण आहे. आईवडील मजुरी करतात. ते बुधवारी सकाळीच कामावर निघून गेले होते. अजय आणि त्याची लहान बहीण दोघेच घरी होते. सकाळी ११.३० वाजता लहान बहीण खेळण्यासाठी बाहेर निघून गेली. बहीण बाहेर जाताच अजयने खिडकीच्या सळाखीला ओढणी बांधून फाशी घेतली.

१५ मिनिटानंतर परिसरातील एका व्यक्तीची नजर अजयवर गेली. त्यानंतर घटनेची माहिती समजली. शेजाऱ्यांनी अजयच्या आईवडिलांना सूचना दिली. नंदनवन पोलिसही घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी अजयचे आईवडील आणि शेजाऱ्यांना घटनेबाबत विचारणा केली. मात्र आत्महत्येचे कारण कोणीच सांगू शकले नाही.

एकुलता एक मुलगा असल्यामुळे जांभूळकर दाम्पत्य अजयवर खूप प्रेम करीत होते. ते कामावर गेले तेव्हा अजय सामान्य होता. लॉकडाऊनमुळे शाळा बंद आहेत. काही दिवसांपूर्वी अजय शाळेतही गेला होता. घटनेच्या काही मिनिटे आधी त्याचे बहिणीसोबत बोलणेही झाले होते. त्यामुळे बहीण जाताच त्याने गळफास घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. नंदनवन पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

 

टॅग्स :Deathमृत्यू