शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर दंत महाविद्यालयाच्या ‘बीडीएस’च्या १२ जागा रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 11:58 IST

शासकीय दंत महाविद्यालयातील दंत वैद्यक पदवी (बीडीएस) अभ्यासक्रमाच्या यावर्षी ५० पैकी १२ जागा शिल्लक राहिल्या आहेत. ‘मॉप अप राऊंड’ झाल्यानंतरही रिक्त जागांचा विळखा कायम आहे.

ठळक मुद्देमागील तीन वर्षांपासून हीच स्थितीप्रवेश प्रक्रियेच्या घोळामुळे विद्यार्थ्यांना फटका

सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासकीय दंत महाविद्यालयातील दंत वैद्यक पदवी (बीडीएस) अभ्यासक्रमाच्या यावर्षी ५० पैकी १२ जागा शिल्लक राहिल्या आहेत. ‘मॉप अप राऊंड’ झाल्यानंतरही रिक्त जागांचा विळखा कायम आहे. प्रवेश प्रक्रियेच्या पद्धतीत घोळ असल्याने याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. या प्रक्रियेत आणखी सुधारणा होण्याची गरज असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.नागपूरच्या शासकीय दंत महाविद्यालयातील ‘बीडीएस’ अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आणि जागा कमी राहत असल्याने २०१३ मध्ये भारतीय दंत परिषदेने (डीसीआय) वाढीव दहा जागेला मंजुरी दिली. यामुळे या जागा ४० वरून ५० झाल्या. परंतु प्रवेश प्रक्रियेतील घोळामुळे दरवर्षी पूर्ण जागा भरल्या जात नसल्याचे वास्तव आहे. ‘बीडीएस’ अभ्यासक्रमांचे प्रवेश सीईटी सेलच्या मार्फत राबिवण्यात आले. ‘मॉप अप राऊंड’ ही घेण्यात आला परंतु त्यानंतरही तब्बल १२ जागा शिल्लक राहिल्या.वैद्यकीय क्षेत्रात करिअर करणारे विद्यार्थी सर्वप्रथम ‘एमबीबीएस’ला प्राधान्य देतात, येथे प्रवेश न मिळाल्यास ‘बीडीएस’साठी प्रयत्न करतात. परंतु गेल्या काही वर्षात ह्यबीडीएसह्णमध्ये भविष्यातील एकूण संधी मर्यादित झाल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांची संख्या कमी होऊ लागली आहे. या शिवाय, राज्यात पुढील वर्षात पाच ते सहा वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. परिणामी, ‘एमबीबीएस’च्या जागाही वाढणार आहे. यामुळे एक वर्ष थांबून ‘बीडीएस’पेक्षा ‘एमबीबीएस’ला प्रवेश मिळवू असा विचार विद्यार्थी करीत असल्याने या जागा शिल्लक राहिल्या असाव्यात, असे बोलले जात आहे. परंतु तज्ज्ञानुसार ‘कट ऑफ डेट’ शेवटच्या दिवसाला घेतले जात असलेले ‘मॉप अप राऊंड’ आणि ‘कट ऑफ मार्क्स’ यात सुधारणा केल्यास ‘बीडीएस’च्या संपूर्ण जागा भरल्या जातील, अशी शक्यताही वर्तवली जात आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र