नागपूर : महामेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत रिच ५ मध्ये सीताबर्डी इंटरचेंजपासून प्रजापतीनगर दरम्यान अप/डाऊन मार्गावर १६.६० पैकी १२ किलोमीटर लांब रेल्वे रुळ टाकण्याचे काम पुर्ण झाले आहे. या मार्गात आनंद टॉकीज ते कॉटन मार्केट चौकापर्यंत २३१ लांब बॅलेंस कँटीलिव्हरचे काम होणार आहे. हा बॅलेंस कँटीलिव्हर रेल्वे मार्गाच्या वरून जाणार आहे. याशिवाय रिच ४ मध्ये व्हायाडक्टचे ८९ टक्के काम पुर्ण झाले आहे. या मार्गावर मेट्रो स्थानकांचे कामही झपाट्याने पूर्ण होत आहे. या मार्गावर एकूण ९ स्थानक प्रस्तावित आहेत. यात कॉटन मार्केट, नागपूर स्टेशन, दौसर वैश्य चौक, अग्रसेन चौक, चितार ओळी, टेलिफोन एक्स्चेंज चौक, आंबेडकर चौक, वैष्णोदेवी चौैक आणि प्रजापतीनगर मेट्रो स्टेशनचा समावेश आहे. या मार्गावर आतापर्यंत १२८४ पैकी १२८४ पाईल्स, २५० पैकी २५० पाईल कॅप, २६६ पैकी २६० पियर, २६५ पैकी २५५ पियर कॅप, ४५ पैकी ४५ पियर आर्म४४ पैकी ४४ ट्रक आर्म, २३९३ पैकी २३९३ सेग्मेंट कास्टींग, २४९ पैकी २३० स्पॅन इरेक्शन, २५० पैकी २४३ क्रॅश बॅरिअर फिक्सींग, २४९ पैकी १११ मिडियन फिक्सींगचे काम पुर्ण झाले आहे. मेट्रो गर्डर लॉंचींग आणि या मार्गावरील एनएचएआयच्या डबल डेकर पुलाचे काम प्रगतिपथावर आहे.
..........