शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019; उपराजधानीतील ५६ उमेदवारांच्या प्रचारासाठी सोशल मिडियावर ११७६ जण सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 11:50 IST

नागपुरातील ५६ उमेदवार सोशल मीडियावर सक्रिय आहे. ते स्वत:च प्रचार करीत आहेत. या उमेदवारांसोबतच ११७६ लोक सुद्धा त्यांचा प्रचार करीत आहेत.

ठळक मुद्देसोशल मीडियावरील प्रचारावर वॉच

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निवडणूक प्रचारासाठी आता केवळ चार दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे राजकीय पक्ष व उमेदवारांचा प्रचार जोरात सुरु आहे. राजकीय नेत्यांच्या जाहीर सभा, पदयात्रा, कॉर्नर मिटिंगसह सोशल मीडियावर सुद्धा उमेदवारांचा प्रचार जोरात सुरू आहे. निवडणूक विभागाच्या सायबर सेलची सोशल मीडियावर बारीक नजर आहे.याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी बुधवारी पत्रपरिषदेत अधिक माहिती देताना सांगितले की, सोशल मीडियावर उमेदवार प्रचार करीत असतात. यात कुठलीही आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल होऊ नये म्हणून सायबर सेलची बारीक नजर आहे. यासाठी सायबर सेलची स्वतंत्र टीम काम करीत आहे. नागपुरातील ५६ उमेदवार सोशल मीडियावर सक्रिय आहे. ते स्वत:च प्रचार करीत आहेत. या उमेदवारांसोबतच ११७६ लोक सुद्धा त्यांचा प्रचार करीत आहे. या सर्वांच्या प्रत्येक पोस्टवर बारीक नजर ठेवली जात आहे. कुणाच्याही व्यक्तिगत किंवा धार्मिक भावना दुखावणार नाहीत, याकडे सायबर सेल नजर ठेवून आहे. कुठलीही आक्षेपार्ह बाब दिसून आली की, लगेच त्याची दखल घेतली जाते. संबंधितांना बोलावून स्पष्टीकरण मागविले जात आहे. व्हॉट्सअ‍ॅपवरील पोस्टवर नजर ठेवणे मात्र कठीण जात आहे. यावरील पोस्टबाबत एखाद्याने तक्रार केली तरच कारवाई शक्य असल्याचेही जिल्हाधिकारी ठाकरे यांनी सांगितले. पत्रपरिषदेला अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके उपस्थित होते.तीन गुन्हे दाखलसोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्याबाबत आतापर्यंत तीन प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. हे तिन्ही गुन्हे तक्रार केल्यानंतरच दाखल झाले. एक सावनेर, दुसरे नंदनवन आणि तिसरे प्रतापनगर पोलीस ठाणे अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.१७५ उमेदवारांकडून आलेल्या जाहिरातींचे प्रमाणिकरणनिवडणूक आयोगाने उमेदवारांच्या प्रचाराची प्रत्येक जाहिरात ही प्रमाणित करूनच प्रकाशित व्हावी, यासाठी एमसीएमसी कमिटी गठित केली आहे. या कमिटीने प्रमाणित केल्यावरच उमेदवाराच्या प्रचाराचे साहित्य प्रकाशित केले जाते. आतापर्यंत १७५ उमेदवारांकडून आलेल्या जाहिरातींचे प्रमाणिकरण करण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

टॅग्स :Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Social Mediaसोशल मीडिया