शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
4
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
5
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
6
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
7
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
8
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
9
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
10
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
11
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
12
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
13
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
14
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
15
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
16
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
17
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
18
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
19
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
20
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

११ हजार प्रकरणे निकाली

By admin | Updated: December 13, 2015 02:55 IST

राष्ट्रीय विधीसेवा प्राधिकरण, राज्य विधीसेवा प्राधिकरण आणि जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाच्या वतीने शनिवारी...

राष्ट्रीय लोक अदालत : राष्ट्रीय, राज्य व जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचा पुढाकारनागपूर : राष्ट्रीय विधीसेवा प्राधिकरण, राज्य विधीसेवा प्राधिकरण आणि जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाच्या वतीने शनिवारी आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये १० हजार ९७४ प्रकरणे आपसी समझोत्याने निकाली काढण्यात आली. लोक अदालतीपुढे २१ हजार ५३७ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी ११ हजार ४१४ प्रलंबित आणि १० हजार २३ प्रकरणे वाद दाखलपूर्व होती. त्यापैकी १० हजार ९७४ प्रकरणे निकाली निघाली. यात ८ हजार १५३ प्रलंबित आणि २ हजार ८२१ दाखलपूर्व प्रकरणे आहेत. विशेष मोहिमेंतर्गत ६ हजार ९१७ प्रकरणे निकाली काढण्यात आली. मोटार अपघात दावा प्रकरणांमधील तडजोड रक्कम १० कोटी २५ लाख ४४ हजार ५१० रुपये होती. केवळ दंड म्हणून १ कोटी १ लाख ७५ हजार ५७१ रुपये वसूल करण्यात आले. भूसंपादन, मोटार अपघात दावे, धनादेश अनादर प्रकरण, दाखलपूर्व वसुली दावे आणि दंड, अशी ४६ कोटी ७७ लाख २० हजार ८३० रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली. मोटार अपघात दाव्याच्या लता बिसेन विरुद्ध सेवकराम आणि श्रीराम जनरल इन्श्युरन्स या प्रकरणात ६० लाखांची नुकसान भरपाई तडजोडीने ५८ लाख रुपये झाली होती. अ‍ॅड. पी. एस. मिराचे आणि मोनाली पठाडे यांनी हे प्रकरण हाताळले. ही संपूर्ण प्रकरणे हाताळण्यासाठी २७ पॅनल तयार करण्यात आले होते. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर सोनवणे यांनी सर्व पॅनल्सना भेटी दिल्या होत्या. न्यायिक अधिकारी पी. एस. तरारे, व्ही. टी. सूर्यवंशी, एम. एस. आझमी, व्ही. सी. बरडे, एम. टी. आसिम, डी. डी. कोचे, कुणाल जाधव, जिल्हा सरकारी वकील विजय कोल्हे, अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील नितीन तेलगोटे, डीबीएचे अध्यक्ष प्रकाश जयस्वाल प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)रेशीमगाठी जुळल्या, सात दाम्पत्य लागले संसारालाकेवळ मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये म्हणून कधी काळी तुटलेल्या रेशीमगाठी पुन्हा जुळल्या. ही किमया कौटुंबिक न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये झाली. अदालतीसमोर आलेल्या एकूण १०१ दाव्यांपैकी सात दाम्पत्य (१४ पक्षकार) हे पुन्हा आपापल्या संसाराला लागले. आई-वडिलाविना भकास आयुष्य जगणाऱ्या मुलांना त्यांचे आई-बाबा मिळाले. त्यामुळे या सर्वांच्या चेहऱ्यांवर ओसंडून वाहत असलेला आनंद हा नि:शब्द होता.काही दाव्यांमध्ये खावटीची तडजोड होऊन सामंजस्याने निपटारा करण्यात आला. खावटीचे एकूण सहा दावे निकाली निघाले. येथील लोक अदालतीच्या चार पॅनलवर न्यायाधीश पलक जमादार, प्रशांत अग्निहोत्री, निवृत्त न्यायाधीश पी. ए. मार्कंडेयवार, बी. पी. ठाकर, अ‍ॅड. रश्मी खापर्डे, अ‍ॅड. स्मिता देशपांडे, अ‍ॅड. अनुराग भलोटिया, अ‍ॅड. सोनल राऊत, समुपदेशक शंकर पांडे, डॉ. मंजूषा कानडे, आर. आर. कोतवाल, संगीता पांडे, झरिना मेहंदी रयानी, एस. डी. भावे, अजय मार्डीकर, डॉ. नंदश्री भुरे आदी होते. कौटुंबिक न्यायालयाच्या ठिकाणी प्रभारी प्रधान न्यायाधीश सुभाष काफरे, न्यायाधीश धवस, एस. व्ही. थोडगे आणि विधिसेवा प्राधिकरणाचे सचिव कुणाल जाधव उपस्थित होते. व्यवस्थापक रसिका कस्तुरे यांचे आयोजन उत्तम होते.