शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कोविड रुग्णांसाठी मध्य रेल्वेचे ११ कोच सज्ज : मनपा-मध्य रेल्वे करणार उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 22:13 IST

Central Railway Covid patients coach नागपुरात कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, मध्य रेल्वेचे नागपूर मंडल मदत करायला समोर आले आहे. मध्य रेल्वने अजनीच्या कंटेनर डेपोमध्ये ११ कोचची रॅक तयार करण्यात आली आहे. महापालिका आणि मध्य रेल्वेच्या माध्यमातून १७६ बेडवर कोविड रुग्णांचा उपचार करणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपुरात कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, मध्य रेल्वेचे नागपूर मंडल मदत करायला समोर आले आहे. मध्य रेल्वने अजनीच्या कंटेनर डेपोमध्ये ११ कोचची रॅक तयार करण्यात आली आहे. महापालिका आणि मध्य रेल्वेच्या माध्यमातून १७६ बेडवर कोविड रुग्णांचा उपचार करणार आहे.

बुधवारी महापौर दयाशंकर तिवारी, मध्य रेल्वेच्या नागपूर मंडलचे मंडल रेल प्रबंधक रिचा खरे, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी, अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, राम जोशी, अतिरिक्त मंडल रेल प्रबंधक जय सिंग, मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांनी कोचेसमध्ये व्यवस्थेची पाहणी केली.

मनपातर्फे डॉक्टर्स, नर्सेस, ऑक्सिजन, औषधी व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. महापौरांनी सर्व व्यवस्था लवकरात लवकर पूर्ण करून रेल्वेच्या कोचेसचा रुग्णांसाठी वापर करण्याची सूचना मनपा प्रशासनाला केली. मध्य रेल्वेकडून ११ कोचेस रुग्णासाठी व १ कोच डॉक्टर व स्टाफसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. येथे कूलर व २२ ऑक्सिजन सिलेंडरची व्यवस्था केली आहे. रेल्वेकडून कोचेस तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याrailwayरेल्वे